पान:काश्मीर वर्णन.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५९ )

त्याच्याजवळ तांब्याची खाण आहे. तिचा शोध कांहीं वर्षांपूर्वी लागला असून तींतून बरेंच तांबें कहूं लागले आहेत. लदाकू प्रांतांत पुगा नांवाच्या दयाच्या पूर्व टोंकास गंधक व टाकणखार यांच्या खाणी चालू आहेत. प्लंबेगो ( शिशासारखी एक धातु ) ही पिरपंजाल डोंगरांत पुष्कळ स्थलीं सांपडते. सुर्मा जम्मू नांवाच्या डोंगरांत व दुसऱ्या कांहीं स्थळीं सांप- डतो. भीमसेनी कापूरही कोठें कोठें पैदा होतो. दगडी कोळसा अलीकडे क्वचित् स्थलीं सांपडूं लागला आहे. सैंधव व सोरमीठ ह्रीं कांहीं स्थलीं पैदा होतात. या देशास मिठाचा पुरवठा मुख्यत्वें पंजावांतील दारा- इस्मालखान प्रांतांतून होतो ह्मणून समजते.

पशु व पक्षी.

 सिंह व व्याघ्र हे भयंकर पशु या देशांत नाहींत. पण चित्ते मात्र पुष्कळ भागांत आढळतात. पांढरा चित्ता कोठें कोठें दृष्टीस पडतो. यांची कातडी श्रीन- गरांत क्वचित् विकरीत येतात. तीं फार महाग असतात. दर एकास वीसपासून तीस रुपयेपर्यंत किंमत पडते. अस्वलें देशाच्या सर्व भागांत आढळतात. यांचा वर्ण काळा व तांबूस किंवा पिंगट असतो. पिंगटांत दोन जाती आहेत. पिंगट जात पर्वताच्या उंच प्रदेशांत व काळी नीच भागांत राहते. काळी अस्वलें तर याही- पेक्षां अधिक खालच्या भागांत राहतात. यास काश्मीर भाषेत हारपूत असें नांव आहे. याची लांबी सहा साडे- सहा फूट असते. याचें कातडें मोठें उबदार असतें.