पान:काश्मीर वर्णन.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५८)
खनिज.

 हिमालय पर्वत ह्मणजे सृष्टिजन्य संपत्तीचें एक मांडार आहे. यावरून या देशांत ती संपत्ति विपुल असलीच पाहिजे. पण तिचा अद्याप व्हावा तसा शोध झाले- ला नाहीं व जो थोडाबहुत शोध लागलेला आहे, त्याचा योग्य फायदा करून घेण्याचें ज्ञान येथील लोकांस आलेलें नाहीं. असो. लदाकच्या पश्चिम भागांत वया | देशाचे उत्तरेस चित्रल व चिलास या प्रांतीं सोन्याच्या खाणी असून त्यांतून कांहीं सोनें काढितात. तसेंच गिल- जितजवळ सिंधु नदाच्या पात्रांत व कोठें कोठें वित- स्तव द्रास नदीस मिळणाऱ्या शिंगो नांवाच्या प्रवा- हांत सोन्याचे कण सांपडतात. पण ते इतके थोडे मिळतात कीं तेणेंकरून शोधणारांची मजुरी सुद्धां चांगली भागत नाहीं. अलीकडे जम्मूजवळ नील रत्नाच्या खाणीचा शोध लागला असून तींत बरेच नीळ सांपडूं लागले आहेत. ही खाण ज्यास सांपडते तो फार दिवस वाचत नाहीं अशी येथील लोकांची समजूत आहे. लदाकू, चित्रल व अनंतनाग इत्यादि स्थली लोखं- डाच्या खाणी पुष्कळ आहेत. सोपूर गांवाजवळ अर्वान, पांपूरजवळ शार व इस्लामवादेजवळ सोप येथें लोखंड तयार करण्याचे कारखाने आहेत. सोप गांवाच्या शेजारच्या डोंगरांत शिसें, तांवें, रूपें व सोनें यांच्याही मिश्र धातु सांपडण्यासारख्या आहेत. पण त्या काढण्याचा उद्योग झालेला नाहीं. कुतिहार प्रांताच्या उत्तर टोंकास हर्पटनर नांवाचें गांव आहे,