पान:काश्मीर वर्णन.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ५७ )

काश्मीर, काश्मीरज, काश्मीरजन्म अशी नांवें आहेत. ती अगदी यथार्थ आहेत. काश्मीरी भाषेत केशरास ( कांग ) असें ह्मणतात. इंग्लंद देशांत इसे - क्स प्रांता जवळ एका जागी केशर उत्पन्न करीत तिला ( सॉफन वॉल्दन् ) केशराची जागा असें नांव आहे.' काल्सी नांवाचें पंजाबांत एक लहान संस्थान आहे, तेथें व कांहीं दुसऱ्या स्थली याची लागवड करूं लागले आहेत. आतां या द्रव्याच्या संबंधानें एक गोष्ट सांगून हें प्रकरण पुरें करितों. याच्या सुगंधाची व सुवर्णाची सर्वत्र तारीफ करितात तें ठीकच आहे. पण भामिनी- विलासांत एका स्थल याच्या कडूपणासही गौरव दिलेले पाहून आह्मांस मोठें आश्चर्य वाटलें. तें वाक्य खालीं देतों. " काश्मीरजस्य कटुताऽपि नितांतरम्या" असो. परत येतेवेळीं आह्मीं मुनशी बागेतून आलों. येथें रेसि- दंट व दुसरे साहेब लोक यांस राहण्यासाठी दाहा बारा बंगले बांधलेले आहेत. रेसिदंट साहेबांचा बंगला दुम- जली असून त्याचें काम मोठें मजबूत व सुरेख दिसलें. तसेंच याच्या भोवतालच्या वर्गाच्याची रचना मोठी प्रेक्ष- णीय आहे. येथें विवाहित साहेब लोक राहतात. अवि- वाहितांनीं राहण्याचे बंगले येथून थोड्या अंतरावर हरि- सिंग बागेंत आहेत. हे सर्व बंगले वितस्तेच्या उज- व्या तीरीं वरच्या बाजूस आहेत. मुनशी बागेच्या वर- च्या बाजूस राममुनशी बाग आहे. तिच्यांत आपलस्, पियर्स, तुती हे वृक्ष व द्राक्षवेली आहेत. श्रीनगर येथील बहुतेक बागांची नांवें पूर्वकालीं तेथें असलेल्या अधिकान्यांच्या नांवांवरून पडली आहेत.