पान:काश्मीर वर्णन.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५६ )

करितात. ही लावण सात आठ वर्षांनी एकवार करावी लागते. याचें उत्पन्न दर एकरास पहिल्या वर्षी पांच सहा पौंड केशर येतें. पुढें पांच सहा वर्षे वीस बेवीस पौंड येतें. आह्मी या बागा पाहण्यास गेलों तेव्हां कांहींतील केशर काढून आपल्या देशांत मिरच्या वाळत घालितात त्या- प्रमाणें वाळत घातलें होतें. कांहींतील केशर काढण्याचें काम चालू असून कांहींतील काढावयाचें होतें. सुमारें पक्के १०,००० शेर ह्मणजे २५० मण केशर दरसाल या बागांत उत्पन्न होतें, असें तपास करितां समजलें. दर तो- ळ्यास आठ आणे प्रमाणें धरिलें असतां महाराजास याचें दरसाल चार लक्ष रुपये येत असतील. एक लदा प्रांतांत दरसाल पक्के ८०० शेर केशर येथून विक्रीस जातें असें डा० हंटर लिहितात. हे बगीचे पाहून आह्मी परत निघणार तों त्यांजवरील हवालदार किंवा रखवालदार शिपायानें आह्मी कोणी मोठे वाचू आहों असें समजून आह्मांस मुजरा ठोकला. त्या मुजऱ्याचा आह्मीं अर्थ समजून केशराचीं कांहीं फूलें व गड्डे किंवा कांदे काढून देण्यास सांगितलें. तेव्हां लगेच मूठभर फुलें व कांहीं कांदे काढून आह्मांस आणून दिले. आह्मीही चेरिमेरी ह्मणून कांही त्याचे हातावर ठेविलें, त्यानें तो खुष झाला असें त्याच्या मुद्रेवरून वाटलें. इकडे आमच्या बरो- बरच्या मनुष्यांनीही कांहीं फुलें तोडून खिशांत भरली. फ्रान्स, इंग्लंद, स्पेन, इटली, चीन, इराण इत्या- दि देशांत याची लागवड अलीकडे बरीच करूं लागले आहेत; परंतु या अप्रतिम सुगंधि द्रव्याचें मूल उत्पत्ति- स्थान काश्मीर देश होय. ह्मणूनच यास संस्कृतांत