पान:काश्मीर वर्णन.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५५ )

आहे. येथें महाराजांचा एक खासगी बंगला, पद्म- स्वामी नांवाचें देवालय व एक जुनी मशीद हीं आहेत. नदीवरील पूल गांवाच्या शेजारी आहे. केशराच्या व फलवृक्षांच्या बागा येथून जवळच आहेत. केशराच्या बागाची खरी शोभा आक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत दृष्टीस पडते; कारण याच महिन्यांत त्याच्या फुलांस वहार येतो. आह्मी याच दिवसांत काश्मीर देशांत असल्यामुळे त्या बागांची अत्यंत रमणीय शोभा आह्मांस सहज पाहण्यास मिळाली. ही शोभा व त्या पुष्पांचा सुगंध यांनीं आमचें नेत्रेंद्रिय व घ्राणेंद्रिय यांस इतका आनंद दिला कीं, कांहीं कालपर्यंत आह्मी त्याचा उप- भोग घेत तसेच उभे राहिलों. हे बगीचे पाहण्यापूर्वी केशराची झाडें कुसुंब्याच्या झाडासारखीं असावीत अशी आमची कल्पना होती. पण ती निवळ चूक होती. हीं झाडें नसून तांबड्या गुलछबू सारखे याचे कंद असतात. या कंदांची उंची पातीसुद्धां ८१९ इंचांहून अधिक नसते.. यांतील अर्धा भाग जमिनींत असून अर्धा वर असतो. प्रत्येक कंदास एकेक तुरा पातीवर बोटभर उंच येतो व त्यास एक फूल येतें. हें फूल कोरांटकीच्या फुलासा- रखें असतें. पण यास पाकळ्या सहा असतात. याच्या देठाचा रंग शुभ्र असतो व पाकळ्यांचा अस्मानी असतो. यांत सहा तंतू असतात. पैकी तीन तांबडे असतात. हेच मुख्य केशर होय. दुसरे तीन पिवळेजर्द असतात, त्यांस वास नसतो; पण त्यांची केशरांत मिसळ करितात. वरील बागांत वाफे तयार करून त्यांतील बांदांवर एकेक फूटाच्या अंतरानें केशराच्या कंदांची लावण जून अगर जुलई महिन्यांत