पान:काश्मीर वर्णन.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५४ )

मंडप, घरें, झोपडी आणि वृक्ष यांजवर चढवितात.या वेली पुष्कळ वर्षे टिकतात. यांची छाया इतकी गाढ पडते कीं, तींतून सूर्यकिरणाचा प्रवेश मुळींच होत नाहीं. उत्तम द्राक्ष चार रुपयेपासून सात रुपये मण विकतें आणि कनिष्ठ प्रतीस दरमणी दोन अडीच रुपये पडतात. दल सरोवराचे कांठीं व ब्रेन नांवाच्या खेड्यांत याचे बगीचे अनेक लागून गेले आहेत. अलीकडे येथील सरकाराचें याच्या लावणीकडे विशेष लक्ष्य लागलें आहे. या वेलींची चांगली जोपा करण्याकरितां इराण देशां- तील दोन माळी आणून ठेविले आहेत व त्यांजवर देख- रेख करण्याचें काम एका फ्रेंच मनुष्याकडे सोपविलें आहे. सप्टेंबर महिन्यांत या वेली घोसांनी ओथंबून जातात. द्राक्षासव काढण्याचा कारखाना दल सरोव- राच्या कांठीं उजवे बाजूस आहे, तो आह्नीं सरोवरांत जातेवेळी पाहिला. आपल्या देशांत साखरेचा पाक करून त्यांत फळें घालून जसे मुरंबे तयार करितात तसे येथे द्राक्षांचा शिरका तयार करून या देशांत मिळणारी फळें त्यांत घालून निरनिराळ्या प्रकारचे मुरंबे वनवितात. कौन्सिलचे सिनिअर मेम्बर रायबहादूर यांचे हेड क्लार्क यांनी दोन प्रकारच्या मुरंब्याची व द्राक्षांच्या दालीची फरमास आह्मांस केली होती.

केशर.

 आह्मी पानांत बसून केशराच्या बागा पाहण्यास पांपूर गांवीं गेलों. याचें जुनें नांव पद्मपूर होते.. हें गांव वितस्तेच्या तीरीं श्रीनगरपासून पांच मैलांवर