पान:काश्मीर वर्णन.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ५३ )

इत्यादि सुवासिक द्रव्यांचे लहानमोठे पुष्पवृक्ष व वेली अनेक स्थली दृष्टीस पडतात. येथल्याप्रमाणें सुंदर व विचित्र रंगांचीं कमलें व वनपुष्पें थोड्याच देशांत उत्पन्न होत असतील. या देशाच्या कांहीं भागांत कापसाची / लागवड करितात आणि जो कापूस पिकतो त्याचें सूत काढून देशी कपडे विणतात. तंबाखू व गांज्या यांची- ही बरीच लागण होते व त्यांचे पीक देशांतील खर्चास उपयोगी पडतें. अलीकडे चहाच्या लावणीचा यत्न चालू केला आहे. तसेंच नाना प्रकारच्या वनौषधी येथें पैदा होतात. पण त्यांची माहिती आह्मांस कशी मिळणार ?

द्राक्ष.

 येथील द्राक्ष ह्मणजे शुद्ध अमृत होय. हें स्वर्गांत इंद्रास सुद्धां दुर्लभ असा लेख राजतरंगिणींत असल्याचें पूर्वी सांगितलेच आहे. ही अतिशयोक्ति आहे. पण येथील द्राक्षे किती स्वादिष्ट असतात ह्याची खरी कल्पना आपल्या देशांत पेट्यांतून जीं काबुली द्राक्षे येतात त्यांचें सेवन ज्यांनीं केलें आहे त्यांस करितां येणार आहे. तत्रापि काबुली द्राक्षांत दोन तीन बिया असतात त्या ह्यांत मुळींच नसून हीं अधिक दिवस टिकतात व विशेष रुचिकर आहेत असें आह्मांस वाटतें. कोंकणांत कर- वंदीचीं झुडपें जशी आपोआप उगवतात तशा द्राक्षवेली या देशांत चोहोंकडे उगवतात. पण यांच्या फलांस बागांत तयार केलेल्या द्राक्षांच्या गोडीची सर येत नाहीं. येथें त्याच्या सहा सात जाती आहेत. त्यांत किरा-मिशी, कांद्री व हसनी या उत्तम होत.याच्या वेली