पान:काश्मीर वर्णन.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )

असतें. चूट हें फळ खाण्यास चागलें लागत नाहीं, पण यांत मांस शिजवून खातात व याच्या त्रिया औषधी आहेत. ऑप्रिकाट हें फळ पीचफळा एवढें असून त्यांत बीं असतें. यांतील तीन जातींची फळें आह्मांस पाहण्यास सुद्धां मिळाली नाहींत. बाकीची सर्व आह्मांस मिळाली तीं मोठीं स्वादिष्ट लागली.
 या देशांत मुख्य धान्य तांदूळ होय. त्याच्या येथें अनेक जाती आहेत. तेथील बहुतेक लोक आपला निर्वाह याजवर करितात. गहू, मूग, उडीद, सातू, जवस व बरग हीं धान्यें येथें उत्पन्न करितात. मका येथें पुष्कळ पिकतो. ज्या लोकांस तांदूळ मिळत नाहीं ते लोक मका, निलंबो ( एक जातीचें बीज ), दुसरीं कनिष्ठ धान्यें व कंदमूलें यांजवर आपलें पोषण करून घेतात. या देशांतील दलदलीच्या स्थलांत शिंगाडा फार पिकतो. याच्या पिकाचें मुख्य स्थान बुलर सरोवर होय. येथें दरसाल पन्नास साठ हजार टन शिंगाडे पिकतात. हें पीक अक्टोबर महिन्यांत येतें. आपल्या देशांतील अति दरिद्री लोक जसे गाजरें, रताळी, शेंदाडी, भोपळे यांज- वर जगतात, तसे येथील लोक शिंगाडे, कमळांची देखें व दुसरीं कंदमूलें खाऊन जिवाचें रक्षण करितात. शिंगाडे वाळवून त्यांचें पीठ करून चपात्या करितात. बटाटे, कोबी व नवलकोल यांची लागवड अलीकडे करूं लागले आहेत. तीं येथें उत्तम निपजतात. मिरची, लसूण, कांदा, मुळा, वांगी, गाजर, मेथी या व दुसन्या भाज्या उत्पन्न होतात. तसेच आगरू, गुलाब, चाफा, मोतिया, मोगरा, जाई, शेवती, पाच, गव्हला, कचोरा