पान:काश्मीर वर्णन.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४९ )

तपश्चर्या केली. तेव्हां एक देवता त्यास प्रसन्न होऊन तिनें शारिका पक्ष्याचें रूप धारण केलें आणि आपल्या चोंचींत एक मोठी शिला धरून ती, तो राक्षस जेथून वर येत असे तेथें ठेविली. या देवीचें दर्शन आह्मांस हरि पर्वतावर झालें. या ऋषीचे नांवावरून या दयास काश्मीर असें नांव पडलें. वरील दोन्ही कथां- वरून हा प्रदेश एक मोठें सरोवर होतें असें ठरतें.
 कोणत्याही देशांत पीक उत्तम येण्यास तेथील हवा, पाणी, जमीन व मनुष्यश्रम हीं मुख्य साधनें होत. येथील उष्णतेचें मान व आर्द्र वातावरण हीं पिकास असावीं तशी अनुकूल आहेत. त्याचप्रमाणें वितस्ता नदी दन्याच्या मध्य भागांतून वहात असून तींतून व सरो- वरांतून अनेक कालवे काढलेले आहेत व भोवतालच्या पर्वतांतून उत्तम पाण्याचे झरे एकसारखे वहात असतात. जमीन तर गाळवट व कसदार असल्यामुळे मोठी सुपीक आहे. पण शेतकीचें ज्ञान येथील लोकांस कमी असल्यामुळे या नैसर्गिक लाभांचा व्हावा तितका उपयोग होत नाहीं असें दिसतें. येथील पिकास पावसापेक्षां उन्हाळ्यांत जें बर्फ वितळतें त्याचा अधिक उपयोग होतो. पर्वतांच्या बाजूंवर जेथें सपाट मैदानें आहेत, तेथें पर्वतांवरील झऱ्यांचें पाणी पाटानें वळवून नेऊन पिकें तयार करितात. हे झरे पूर्वेकडील पर्वतांवर अधिक आहेत. या देशीं । भाताचें पीक मुख्य असल्याकारणानें लागवड जमिनींपैकीं तीन चतुर्थांशांत त्याची लावण करितात. आपल्या देशा- प्रमाणें येथें रब्बी व खरीप अशीं दोन पिकेँ होतात. पहिल्यांत गहू, जवस, वाटाणा, मूग व उडीद हीं उत्पन्न
 5