पान:काश्मीर वर्णन.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४८ )
जमीन.

 अति प्राचीनकाल काश्मीर दरा हा एक महान् सरोवर होतें असें अनुमान करितात. गोड्या पाण्यांत राहणाऱ्या माशांचे अवशिष्ट भाग कांहीं सपाट जमि- नीवरील प्रदेशांत सांपडले आहेत, त्यांजवरून व कोठें कोठें पर्वतांच्या बाजूंवर पूर्वकाली पाण्याच्या लाटा मारल्याच्या खुणा दृष्टीस पडतात, त्यांजवरून वरील कल्पनेस दृढीकरण येतें. पुढें जलाशयाचा जोर अनिवार्य होऊन पर्वताची जी बाजू कमजोर होती तिकडून पाणी फुटून तो लोंढा बाहेर फुटला असावा असें दिसतें. कारण, काश्मीराहून मरी नांवाच्या रस्त्यानें परत येऊं लागलें असतां वाटेंत पर्वताच्या बाजूंवर झालेले खांड व भेगा सूक्ष्म रीतीनें पाहणारांच्या नजरेस येतात.
 या सरोवराविषयी अशी एक कथा आहे की, याचें पूर्वीचें नांव साहस्तिसार किंवा सतिसार असून त्यांत बलदेव (जलदेव ) नांवाचा एक राक्षस राहत होता. तो सरोवरांतील सर्व मत्स्य गिळून टाकून भोंवतालच्या टेंकडीवर राहणाऱ्या लोकांचें भक्षण करूं लागला. तेव्हां ते लोक पर्वताच्या उंच भागावर जाऊन राहिले. यावेळी कश्यप ऋषि तेथें प्राप्त झाले आणि त्यांनी सरोवराच्या वायव्य टोंकास बरामुला येथें आपला त्रिशूल जैमि- नींत खोवला ; तेणेंकरून ती जमीन दुभागून सरोवरांतील पाणी नाहींसें झालें आणि तो राक्षस मरण पावला. दुसरी कथा अशी आहे कीं, राक्षसाच्या भक्षणाने सर्व लोक मोठे त्रस्त होऊन ते कश्यप ऋषीकडे गेले ह्मणून त्यांनी