पान:काश्मीर वर्णन.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४६ )

वाहत असलेली दृष्टीस पडली. हिच्या कांठच्या शोभा- यमान् वृक्षराजी, निरनिराळे वर्ण धारण करणारी पर्वत - शिखरे व अस्मान हीं नदीच्या प्रवाहांत प्रतिबिंबित झाली असल्यामुळे इंद्रचापाच्या शकलांप्रमाणें सुंदर दिसत होती. एके बाजूस पिकानें शोभायमान झालेली हिरवीं गार शेतें, रांगोळी घातल्यासारखे त्यांतील वाफे व त्यांच्या भोंवतीं फिरविलेले पाण्याचे पाट; यांच्या पलीकडे सफेदा,चिनार व तुती इत्यादि वृक्षांचे कुंज, त्यांत मधुर शब्द करीत भ्रमण करणारे सुंदर पक्षी, उत्तरेस व पश्चि- मेस एकाहून एक उंच होत गेलेली बर्फाच्छादित शिखरें, वायव्येस वानगाट दन्याच्या वरच्या बाजूस रुप्या- प्रमाणें चमकणारें हरमुक पर्वताचें शंक्वाकृति शिखर, दूर पूर्वेस अमरनाथ, नैर्ऋत्येस श्रीनगर, त्यास दुभागून वाहणारा वितस्तेचा प्रवाह, त्यास शोभा देणारे तिच्या कांठचे राजवाडे, मंदिरें व दुसऱ्या इमारती; प्रवाहांतून काढलेले किंवा प्रवाहास मिळणारे कालवे, त्यांवरील वृक्षांच्या राजी, मुनशी बाग, त्यांतील बंगले; उत्तरेस दल सरोवर, त्यावरील कमलाच्या व दुसऱ्या वेली, त्याच्या कांठची आराम मंदिरें, त्यांतील तरंगत्या बागा व बेटें, भोंतालच्या वृक्षांची दाट झाडी, तिच्यांतील लहानशीं गांवें, या सर्वांच्या सभोंवतीं वर्फ आणि वृक्ष यांनी आच्छादलेली पर्वत शिखरें, सूर्य किरणांच्या पतनानें उत्पन्न झालेली त्यांजवरील चकाकी, शिखरांवरून खाली खोल व भयाण दन्यांत उड्डाणें मारीत वाहणारे जलौघ, त्यांतील धबधबे, त्या दन्यांत संचार करणारे पशुपक्षी, असा हा अपूर्व व अति सुंदर देखावा पाहून चित्तवृत्ति