पान:काश्मीर वर्णन.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४५ )

हिची उंची श्रीनगराहून सुमारें एक हजार फूट आहे. पण ती चढण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें आह्मी झंपानांत बसून वर गेलों. हा पायमार्ग अति विकट असून फार अरुंद आहे. कित्येक स्थलीं दोन मनुष्यांस हातांत हात धरून जातां येत नाहीं. बाजूचे दरे इतके खोल आणि कडे तुटलेले आहेत की, या मार्गाने जाणाऱ्या मनुष्याचें थोडें पाऊल चुकलें असतां त्याचें हाड सुद्धां मिळावयाचें नाहीं. वाहक लोक आह्मांस वर नेत असतां, आतां हे आह्मांस खरोखरीच स्वर्गांत पोहोंचवितात कीं काय, असा विचार मनांत येत असे. वर गेल्यावर प्रथम देवालयांत जाऊन शंकराचे दर्शन घेतलें. हें देवालय अशोक राजाचा पुत्र जो जलौक त्यानें इ० स० २२० वर्षांपूर्वी बुध्धाकरितां बांधलें होतें असें ह्मणतात. येथें वसति नाहीं. पण डोंगराच्या पायथ्याशी एक खेडें असून तेथील एक ब्राह्मण दररोज येऊन शंकराची पूजा करून जात असतो ह्मणून समजलें. हरी पर्वतावर आह्मांस पुजाऱ्यांनी घेरिलें तसा येथें एकही दृष्टीस पडला नाहीं, एवढेच नव्हे पण देवाची पूजा दररोज होत असल्याची चिन्हें आमच्या चर्मचक्षूस तरी दिसली नाहींत. शंक-राचा मंडण मिश्राच्या पत्नीशी संवाद याच स्थलीं झाला ह्मणून सांगतात.असो.
 पुढें बाहेर येऊन एका उंच स्थली उभे राहून भोंव- तालची वनश्री पाहूं लागलों, तों पायथ्याशीं वितस्ता, शंकरानें गंगेस मस्तकीं धारण करून आपणास मात्र वाट फुटेल तिकडे जाण्यास सांगितलें ह्मणून मोठ्या त्वेषानें आक्रोश करीत भुजंगीप्रमाणें निरनिराळी वळणे घेऊन