पान:काश्मीर वर्णन.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४४ )

अस्थि टाकितात. येथें एक शिवालय आहे. श्रावण महिन्यांत हिंदु लोक पर्वतावर चढून जाण्याचे कष्ट सोसून मोठ्या भक्तीनें या तीर्थास जातात. वानगाट येथें अति प्राचीन काळच्या देवालयांचे अवशिष्ट भाग दृष्टीस पडतात. तीं देवालयें या तीर्थाच्या संबंधाने बांधलेली असावीत असें कांहीं विद्वान् लोकांचें मत आहे. तसेंच - कंसनाग (केसरनाग ) या नांवाचें सरोवर फत्ते पंजाल . नांवाच्या पर्वताच्या उत्तरेस आहे.याची लांबी पाऊण मैल व रुंदी ४२५ यार्ड आहे.बर्फ वितळून तें पाणी या सरोवरांत येतें. शेषनाग हें लिदार दऱ्याचे वरच्या बाजूस आहे. तें अमरनाथास जातेवेळी मार्गांत लागतें.

देखावे ( सृष्टिसौंदर्य. )

 या देशास आपल्या व पाश्चात्य देशांतील विद्वानांनी भूस्वर्ग असें नांव देऊन त्याच्या सौंदर्याचीं गाणीं गाइलीं आहेत. पण आमच्या मतें यास नंदनवन किंवा सृष्टिसौं- 'दर्याचा देश असें ह्मणावें. कारण अति रमणीय व आनंद देणारीं स्थळें येथें इतकी विपुल आहेत कीं, त्या सर्वांचें वर्णन देण्यास एक वेगळाच ग्रंथ लिहिला पाहिजे. आह्मी मार्गक्रमण करीत असतां जे अति प्रेक्षणीय व मनोहर देखावे दृष्टीस पडत गेले, त्यांतील कांहींचें व दल सरोवरावरील देखाव्याचें वर्णन आमच्या प्रियवाचकां- करितां पूर्वी दिलेच आहे. आतां शंकर पर्वतावरून जो देखावा आमचे पाहण्यांत आला त्याचें वर्णन देण्याचा यत्न करितों. येथून काश्मीर दन्याचा बहुतेक देखावा दृष्टीस पडतो. ही टेंकडी श्रीनगरच्या ईशान्येस आहे.