पान:काश्मीर वर्णन.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४३ )

नदीच्या उजव्या तीरी आहे. यांच्यामध्ये एक कालवा काढलेला आहे. या सरोवराची लांबी तीन व रुंदी एक *मैल आहे, पण यांतील पाणी मात्र ४०/५० फूट खोल असतें. यांत नाना प्रकारच्या कमलवेली आहेत. जुलई महिन्यांत त्यांस बहार येतो. तेव्हां सर्व सरोवर सुंदर कमलांनी आच्छादिलें जाऊन त्याजवरील देखावा मोठा रमणीय दिसतो. बिल्हण कवीनें येथील वनश्रीचें सुरेख • वर्णन दिले आहे. येथील हवा मोकळी व आरोग्य- . कारक आहे. एकांत पण रम्य स्थली राहण्याचें मनांत आलें ह्मणजे नूरजहान येथें जाऊन राहत असे. तिजकरितां जहांगीर बादशहाने याच्या कांठी एक आरामगृह बांधिलें होतें येथें एकाद्या उंचवट्यावर उभे राहून पाहिलें असतां सिंद नांवाच्या दऱ्यांतील कांही भाग दृष्टीस पंडतो. याशिवाय लदाक् प्रांतांत लहान मोठी सरोवरें अनेक आहेत. त्यांतील कांहीं क्षार पाण्याची आहेत. या प्रांताच्या पूर्व टोंकास व्यांगकांग नांवाचें सरोवर आहे. याची लांबी ४० व रुंदी २-४ मैल आहे. याचा निमेहून अधिक भाग लदाक् प्रांतांत असून बाकीचा चिनई तिबेटांत आहे. याचेंही पाणी क्षार असल्यामुळे पिण्याचें उपयोगी नाहीं. हार- मुक नांवाचे पर्वताच्या पायथ्याशी गंगावल ह्मणून एक लहान सरोवर आहे. याची लांबी सुमारें दोन मैल व / रुंदी पाव मैल आहे. पर्वतावरील बर्फ वितळून यास पाण्याचा पुरवठा होतो. आपल्या देशांतील लोक भागीरथीस जशी अति पवित्र मानितात तसे काश्मीरी लोक या सरोवरास मोठें पवित्र मानून त्यांत प्रेतांच्या