पान:काश्मीर वर्णन.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४२ )

होऊ लागली. यांच्या योगानें सरोवरास मोठी शोभा आली आहे. या बागांचें विशेष वर्णन पुढे देणार आहों. कांहीं पुढे गेलों तों डाव्या बाजूच्या झाडींतून रघुनाथपूर नांवाचें गांव वर डोकावूं लागलें. उजवे बाजूस सोन-लंकारूपलंका नांवांचीं सुंदर उपद्वीपें दिसूं लागली. सोनलंका हें बेट जहांगीर बादशहानें आपल्या प्रिये - करितां तयार करविलें होतें असें सांगतात. हा सर्व देखावा पहात किस्तीतून थोडें पुढे गेलों तों तरंगत्या बागा लागल्या. या बागांस तेथील लोक (राद ) असें ह्मणतात. लांब पसरणाऱ्या वेली किंवा लव्हाळ्यासारखें उंच गवत कापून त्याच्या जुड्या बांधितात आणि सरो- वराचा उथळ भाग पाहून त्याजवर हंतरतात. नंतर पुन्हां त्यांजवर थोडेंसें 'गवत टाकून वर माती पसरितात. याप्रमाणें जमीन तयार करून तिजवर निरनिराळ्या प्रकारचीं बुटुकली फुलझाडे, वेली, कलंगडी, काकड्या इत्यादिकांची लावण करितात. वसंतऋतूंत भोंवतालचा जलाशय चित्रविचित्र रंगांच्या कमलांनी आच्छादिला जातो आणि या बागांतील वृक्षांस व वेलींस फलपुष्पांचा बहार येऊन जेव्हां त्या तरंगू लागतात तेव्हां हा प्रदेश किती रमणीय दिसत असेल ! हें अप्रतिम सृष्टिसौंदर्य पाहण्याचा लाभ आह्मांस झाला नाहीं. तत्रापि ही वेळ पावेतों जेवढा देखावा दृष्टीस पडला तेवढ्यानेंच आमचें मन इतकें रममाण होऊन गेलें कीं, तेथून बिन्हाडीं पर- नावेंसें वाटेना. पण रात्रीं तेथें राहण्याची पूर्वी तजवीज केली नसल्यामुळे परतणें भाग पडलें.
 मानसवल हें सरोवर वुलरच्या आग्नयेस वितस्ता