पान:काश्मीर वर्णन.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३९ )

दुधगंगा हिचा उगम पिरपंजाल पर्वतांत होऊन ती वितस्तेस श्रीनगराजवळ मिळते. मारवाड व कामित हे दोन प्रवाह एकत्र होऊन पोहरा नदी बनते. ही सोपूर गांवाच्या खालच्या बाजूस वितस्तेस मिळते. सिंद हिचा उगम अमरनाथ नांवाचें प्रसिद्ध जें शिव- स्थान याच्या जवळील पर्वतांत होऊन तिचा संगम वित- स्तेशी ज्या गांवाजवळ होतो त्यास शादीपूर ( लग्नाचें गांव ) असें ह्मणतात. नूरजहान हिने या नदीवर एक पूल बांधला होता. विश्वा ही नदी कौंसनाग नांवाच्या सरोवरांत उगम पावते. हिच्या प्रवाहानें हरिबल नांवाचा एक सुरेख धबधबा बनला आहे. नैनसुख ही लोसुर नांवाचें सरोवरांतून निघून पाटन गांवाजवळ वितस्तेस मिळते. लिदार ही इसलामबाद गांवाचे खाली पांच मैलांवर वितस्तेस मिळते. सिंद, पोहरा आणि लिदार या उजवीकडून वितस्तेस मिळतात. यांतील कांहींवर दोन्यांचे पूल केलेले आहेत. त्यांची रचना मोठी चमत्कारिक आहे. अनभ्यस्त मनुष्यास हे पूल ओलांडून जाणें असल्यास फारच सावध रहावें लागतें. पण यांतील कांहींवरून काश्मीरी तहें सुद्धां जातात.

सरोवरें.

 या देशांत लहान मोठीं सरोवरें अनेक आहेत. बुलर हें सर्वांत मोठें होय. त्याचें वर्णन आम्ही मार्गक्रमण भागांत दिलेच आहे. दुसरें दल हैं श्रीनगरच्या ईशान्येस आहे. त्याची लांबी सुमारें पांच व रुंदी अडीच मैल आहे. त्यांतील पाणी आठ दहा फुटांपेक्षां अधिक खोल