पान:काश्मीर वर्णन.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३८ )

वरास जाऊन मिळते. वरील सरोवरास मिळण्यापूर्वी सिंद नांवाची नदी उत्तरेकडील पर्वतांत उगम पावून तिला मिळते. नंतर हा सर्व जलौघ पिरपंजाल पर्वतांतील बरामुला नांवाच्या अरुंद खिंडीतून बाहेर पडतो. उगमापासून बरामुलापर्यंत झेलमची लांबी १२० मैल आहे. पैकी ७० मैलांत नावा चालतात. श्रीनगरा- जवळ तिचें पात्र २६० फूट रुंद आहे. मुजाफरवाद येथें हिला किसनगंगा ( कृष्णगंगा ) येऊन मिळते. हिचा उगम बालतिस्तान ( लहान तिबेट ) येथें होतो. वितस्ता चिनाव नदीस तिम्मू नांवाचे गांवाजवळ मिळते. हिची सर्व लांबी ४२० मैल आहे. पर्वतांतून या नदी इतकी जागोजाग वळणे घेत जाणाऱ्या नद्या थोड्या सांगतां येतील. हिच्या कांठीं मुख्य गांवें श्रीनगर, झेलम, पिंडदादरखान, मिआनी, भेरा व शहापूर हीं आहेत. जुलई व आगस्ट महिन्यांत हिला पूर येतो तेव्हां हिचें पाणी बारा फूट चढतें. हिच्यावर तेरा पूल आहेत. पैकीं श्रीनगर येथें सात व बाकीचे दुसऱ्या गांवांजवळ आहेत.
 आतां येथील दुसऱ्या नद्या किंवा मोठे प्रवाह यांज- विषयीं थोडीशी माहिती देतों. किसनगंगा, दुधगंगा, पोहरा, सिंद, मारवाड, विश्वा, नैनसुख, लिडार इत्यादि लहान मोठे अनेक प्रवाह आहेत. यांतील बहु- तेक प्रवाह वितस्तेस येऊन मिळतात. या देशाच्या वायव्येस तिलेल नांवाच्या दऱ्यांत दोन तीन ओहोळ एकत्र होऊन किसनगंगा ही नदी बनली आहे. ही कोहाला नांवाच्या गांवाजवळ वितस्तेस येऊन मिळते.