पान:काश्मीर वर्णन.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४ )

तोच भोवतालच्या उच्च पर्वतांवरील स्थलीं १८ अंशा- पर्यंत उतरतो. या दिवसांत बर्फानें सर्व पर्वत आच्छा- | दिले जातात, इतकेंच नाहीं पण एकादे वर्षां नद्या व | सरोवरें यांतील पाणी सुद्धां गोठून त्यांजवर ४१६ इंच जाडी बर्फाचा थर बनतो. इ० स० १८८७ सालच्या हिंवाळ्यांत दल सरोवरांतील पाणी गोठून त्याच्या पृष्ठ- भागावर चार इंच जाड बर्फाचा थर बनला होता आणि साहेब लोक त्याजवर लोखंडी जोडे घालून कित्येक दिवस खेळत होते. या राज्यांत सर्व प्रकारची हवा आहे असेंही ह्मणण्यास हरकत नाहीं, कारण मुख्य दऱ्यांत व त्याच्या भोवतालच्या पर्वतांवर जशी अति कडक थंडी पडते तसाच जम्मू येथे उन्हाळाही अतिशय होतो.
 या हवेत असा एक विलक्षण गुण आहे कीं कांहीं स्त्रिया त्यांच्या प्रकृतीस विकृति झाली असल्यामुळे गरोदर राहत नव्हत्या. पण हवा पालटण्याकरितां त्या या देशांत येऊन कांहीं महिने राहिल्या आणि गरोदर | होऊन मातृपद पावल्याची उदाहरणें अनेक आहेत असें इन्स साहेब आपल्या ग्रंथांत लिहितात. सपाट प्रदेशां- "तून पर्वतांकडे जसजसें उच्च प्रदेशांत जावें तसतशी अल्पावकाशांत हवा बदलत जाऊन तींत उत्पन्न होणारे | भिन्न जातींचें उद्भिज दृष्टीस पडूं लागतें. श्रीनगरच्या आसमंतांतील प्रदेश पावसाळ्यांत पाण्याने आच्छादला जातो आणि त्यांत भाताची लागवड करितात. यामुळे येथील हवा अगदीं बिघडून जाते आणि एक जातीचा शीत ज्वर ज्यास इंग्रजीतळे “मलेरिया" ह्मणतात, तो केव्हां केव्हां उत्पन्न होतो.