पान:काश्मीर वर्णन.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३९ )
पर्वत.

  या सर्व देशांतील पर्वत हिमालयाचे फांटे आहेत. त्यांतील कांहीं मुख्यांची नांवें सांगतो. पिरपंजाल ( पंतसाल ) नांवाची रांग या देशाच्या मध्यभागी आहे. तिची लांबी ४०० मैल आहे. तीत मली व हरटोपा नांवांची दोन शिखरे आहेत. त्यांची उंची अनुक्रमें १३,९९० व १३, ० ४ ० फूट आहे. उत्तरेस हरमुखअमर नांवांची शिखरे आहेत. ती श्रीनगरापासून दृष्टीस पडतात. त्यांची उंची १६,९०० व १६,००० फूट आहे. गुलमर्ग, सोनार्ग, झेजीमर्ग व रुबमर्ग या पुष्पवाटिका याच पर्वतावर आहेत. यांतील पहिल्या दोन स्थलांचे वर्णन पुढे देणार आहों. उत्तरेस गिजित प्रांतांत १८,००० पासून २४,००० फूट उंचीची शिखरे आहेतं. ईशान्येस काराकोरम नांवाच्या पर्वतांत एक शिखर तर २८,२६५ फूट उंच आहे. नंगा पर्वत या देशाच्या वायव्येस आहे. त्याची उंची २६,६२९ फूट आहे. उत्तरेकडील पर्वतांवर झाडी विशेष नसल्यामुळे ते शोभिवंत दिसत नाहीत. पण ते अधिक कालपर्यंत बर्फाच्छादित असतात व त्यांजवरून अनेक प्रवाह खाली येत असतां त्यांचे धबधबे बनले आहेत. दक्षिणेकडील पर्वतांवर झाडी दाट असल्यामुळे तेथील वनश्री मोठी रमणीय दिसते. या देशाच्या आग्नयेस कैलास नांवाचा पर्वत आहे. त्याची उंची २२, ० ० ० फूट आहे. पुराणप्रसिद्ध शंकराचा कैलास तो हाच असावा असे अनुमान | आहे. त्याचे नंगा नांवाचे शिखर २६,६०० फूट उंच