पान:काश्मीर वर्णन.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३ )
हवापाणी.

 येथील हवेचे मान आपल्या देशापेक्षां फार भिन्न आहे. मार्च महिन्याचे अखेरीस व एप्रिलचे आवलीस येथील दन्यांत झंझावात सुटून पाऊस व गारा पडतात आणि मे व जून महिन्यांत पावसाची पुष्कळ सरवटें येतात. जुलई किंवा आगस्ट महिन्यांत थोडे दिवस श्रीनगर येथे फारच उष्मा होतो. तेव्हां मोठी गर्जना होऊन विजा चमकू लागतात आणि त्याबरोबर केव्हां केव्हां मोठा पाऊस पडून व पर्वतांवरील बर्फ वितळून वितस्तेस दांडगा पूर येतो. पुढे सप्तंबर महिन्यांत पुनः पुष्कळ पाऊस पडतो, अक्टोबर व नवंबर महिन्यांत केव्हां केव्हां थोडा पडतो. या दन्यांत सर सालांत २०।२९ इंचांपेक्षा अधिक पाऊस पडत नाही, पण भोंवतालच्या पर्वतांवर हिमाचलाच्या बाकीच्या भागांप्रमाणे विपुल पडतो. जुलई व आगस्ट महिन्यांत । श्रीनगर येथे अति उष्मा भासू लागतो. तेव्हां उष्णतामापक यंत्रांत पारा ६ ०/७० अंश पर्यंत चढतो. या दोन महिन्यांतही केव्हां केव्हां थोडासा पाऊस पडतो. यावेळी साहेव लोक हवा बदलण्याकरितां गुलमर्ग, सोनामर्ग किंवा दुस-या थंड स्थली जाऊन राहतात. त्यावेळी येथे ३०॥३५ अंश पर्यंत पारा चढतो. नोव्हेंबर महिन्याचे मध्यापासून धुके पडावयास लागून महिना अखेर सर्व दरा त्याने व्यापून जातो. पुढे दिसेंबर अवलपासून फेब्रुवारीचे मध्यापर्यंत अति कडक थंडी पडते. त्यावेळी दन्यांत ३०।३२ अंशपर्यंत पारा उतरतो व