पान:काश्मीर वर्णन.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१ )

उत्तम चांदी अग्नींतून तावून काढल्यावर जशी चमकते तशी चमकूं लागलीं. हें पाहून त्यांजवरील वृक्षही माना डोलवू लागले. याप्रमाणें या कलहाचा आरंभ व शेवट जाहला. पण आमचे हांजी साहेब व त्याच्या बहिणी यांनी तिकडे मुळीच लक्ष न देतां आपली होडी हांकारण्याचे काम चालू ठेविले होते. वर सांगितल्या प्रकारचे अपूर्व देखावे पहात व होडींतील अंदोलनाचा उपभोग घेत सुमारे दहा वाजतां नदीच्या कांठी आह्मी एका खेड्याजवळ आलो. त्याचे नांव टिपून घेण्यास विसरलों. येथे भोजन करून अस्तमानी शादीपूर येथे नावेतच रात्र कादिली. शादीपूर आणि सोपूर यांच्या दरम्यान नारू नांवाचा एक कालवा काढिलेला असून वुलरांत तुफान होते तेव्हां किस्त्या या कालव्यांतून चालवितात. नित्याप्रमाणे दुस-या दिवशी हांजी व त्याच्या बहिणी यांनी होडी ओढण्याचे काम सुरू केले. श्रीनगर केव्हां दृष्टीस पडेल ह्मणून आह्मी मोठे सोत्कंठ झालो होतो, करितां भोजनास नदीचे कांठीं न उतरतां नावेतच सोनी, दशम्या व दुसरे दोन जिन्नस तयार करवून तेथेच उपहार केला. आज रोजी सफेदा, चिनार व दुसरे वृक्ष यांची दोहों तीरी दाट झाडी दृष्टीस पडत गेली. वाटेत जागोजाग कुरणे लागली. त्यांत गाई, घोडी व बकरीं हीं यथेच्छ चरून वितस्तेचे अमृततुल्य पाणी पिऊन आनंदांत असल्याचे त्यांची मुद्रा दाखवीत होती. श्रीनगर आमच्या केव्हां नजरेस पडेल असे वारंवार हांजीसः विचारीत होतो. आमच्या अत्युतूकंठेमुळें आमची होडी आजरोजी फार सावकाश चालली आहे असें