पान:काश्मीर वर्णन.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
Eminariring Swalayhip throydonian
( ३० )

यावेळीं बालार्कानें आपलीं आरक्त व प्रज्वलित किरणें सर्व भूतलावर फेकण्यास आरंभ केला होता, तेणेकरून अष्टदिशारूप ललना श्रृंगारल्या सारख्या दिसून त्यांस मर्यादित करू पाहणारा जो हिमाचल त्याजकडे पाहून त्या हसू लागल्या. तसेच त्यांस आड येणारी जी त्याची शिखरे ती त्यांना आपला पराजय केला असे पाहून संतापाने लाल झाली. या पराभवाने कांहींची मुखें तर काळीठिक्कर होऊन ती नेत्रावाटें जलधारा सोडू लागली. या कलहांत आपण पडावे तर गोष्ट कोणत्या थरास जाईल याचा नियम नाही असा विचार करून वायु स्तब्ध राहिला. आपणास आधारभूत जी शिखरे त्याचा पराजय पाहून सर्व वृक्ष तटस्थ उभे राहिले. या परी भवावर आच्छादन घालून कलहाचा कसा तरी सन करावा अशा हेत” मेघमंडळ दोघांमध्ये आडवें आलें. तत्रापि संतापाने लाल व भीतीने कंपायमान झालेला ता शिखरे जलाशयांत मधन मधन दृग्गोचर होत हाताचा बलाढ्यांच्या भांडणांत आपली धडगत दिसत नाही; पाहून सर्व पक्षी कलकलाट रूपाने आक्रारी करू लागले. पृथ्वीवर हा काय दंगा चालला आहे त्या शोध करण्याच्या बुडीने जलचर प्राणी वारंवार डाका वर काढीत आणि क्षणमात्र इकडे तिकडे अवलोकन करून सट्टदिशी खाली जात. अशा धांदलीत कांहीं काल गेला. अखेर बालाकचा वरचष्मा झालेला पाहून मेघमंडळानेही पळ काढला. तेव्हां वायूही जयपक्षाचा स्वीकार करण्यास त्याच दिशेने वाहू लागला. इकडे हिमाच्छादित शिखरे संतापाने जी लाल दिसत होतीं तीं