पान:काश्मीर वर्णन.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४ )


पाहण्याची आमची इच्छा नाहीं ह्मणून त्यास सांगितलें. वरील गुमास्ते आह्मांजवळ बसले होते. ते आमचें बोलणें ऐकून ह्मणाले तुह्मी काश्मीर देश पाहावयास येऊन तें गांव पाहाण्यास जात नाहीं ह्मणेतां हें काय ? असें बोलून त्यांनीं शेजारचा गांव, किल्ला व बाग दाखविण्यास हांजीस सांगितले. तेव्हा आह्मीं त्याजवरोबर पुलावरून गांवांत गेल. येथील लोकांची ठेवण,पेहराव, त्यांची भाषा, घरें व दुकानें ही पाहतांच आता मात्र आह्मी काश्मीरांत खरे आलो असे वाटले. गांव दाखवून हांनी एके बाजूस आम्हांस थोडे दूर घेऊन गेला, आणि हा पहा किल्ला म्हणाला. तेव्हा कोठे आहे तो. ह्मणून विचारितां तो येथेच होता पण पृथ्वी कांपली तेव्हां सर्व गांव व किल्ला तिच्या पोटांत गारद झाला असे त्याने सांगितले. तेव्हा या देशांत पांच सहा वर्षांपूर्वी भयंकर भूकंप झाल्याचे वर्तमान आह्मी वाचीत होतो. त्याचे स्मरण झाले. येथे किल्याचे रूप तर कांहींच राहिले नाहीं. पण कोठे त्याच्या पडक्या तटाचा थोडा भाग, कोठे बुरंजाची खूण, कोठे दगडांचे ढीग, व मध्ये मध्ये खड्डे पडलेले असून त्यांजवर गवत उगवलेले मात्र दृष्टीस पडले. हा देखावा पाहून भूकंपानें केवढ्या उलटापालटी होतात याची कल्पना आम्हांस करितां आली आणि हा एक प्रकारचा लाभच झाला असे वाटले. . नंतर हांजी बाग दाखविण्यास नेऊं लागला. पण अस्तमान झाला होता. व कांहीं दूर नेऊन किल्लयाच्या नमुन्याप्रमाणे हा पहा बाग म्हणून त्यानें दाखविला तर आमच्या पायाचे भाडे मात्र फुकट जाणार असें समजून