पान:काश्मीर वर्णन.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५ )

तिकडे न जातां आमच्या किस्तीकडे परतलों आणि ही रात्र आम्ही त्याच्या कितीतच काढली व याच रात्री कांग्री ( शेगडी )चा आम्ही प्रथम आश्रय केला. हिची रचना पाहण्यासारखी आहे ; पुढे रिकामे बसण्यापेक्षां कांहीं तरी उद्योग करावा असे मनांत आणून तेथे कांहीं टिपणे घेतली, तीच येथे देतो.
 होडी, नाव, तरी, आंबी, नावाडी हे शब्द या देशी कोणास माहीत नाहीत. येथे होडीस किस्ती व तिच्या चालकास हांजी म्हणतात. येथील होड्यांची करणावळ आपल्या देशांतील होड्यांपेक्षां पुष्कळ भिन्न आहे. या होड्या अगदी चिंचोळ्या असून फार लांब असतात. या किस्त्यांत चार प्रकार आहेत. पैकी दोन्हींत प्रवासी लोक बसून जातात येतात व दोन्हींत माल भरून नेतात. प्रवासी लोक ज्यांत बसतात त्यांस डुंगा व शिकारी अशी नावे आहेत. या दोहोंची रचना सारखीच असते पण शिकारी लहान व हलकी असते. आह्मीं जी होडी भाड्याने केली, तिची रुंदी पुरी चार हात नसून ' लांबी मात्र चाळीस हात होती. तिच्यावर मध्यभागी ८-१० हात लांबीचा. एक गवती चटयांनी मढविलेला बंगला अगर दुपाकी छप्पर होते. या छप्पराची उंची अडीच तीन में हात होती. त्यांतच आह्मी व आमची दोन माणसे जेवणखाण व निजणे बसणे करीत होतो. बंगल्याच्या एके बाजूस हांजी व त्याची मनुष्ये आपला खाना तयार करीत व तेथेच निजत बसत. आह्मी उन्हाचे वेळी दुसरे बाजूस बाहेर बसत होतो. एक दोन वेळां आमच्या मनुष्याने आमच्या उपहाराची तयारी येथेच
 3.