पान:काश्मीर वर्णन.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२)

चढउतार पुष्कळ असून रस्ता फार खराब आहे, व मुक्काम करण्यास कांहीं गांवीं रहदारी बंगले किंवा दुसऱ्या सोयीच्या जागाही नाहींत. शिवाय या मार्गाने गेलें असतां दोन भयंकर खिंडी ओलांडून जावे लागते व ऑक्टोबरच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंत या मार्गावरील सुमारे पन्नास मैल रस्ता बर्फामुळे बंद असतो. पण पूर्वी मोंगल बादशहा याच मार्गाने जात असत. औरंगजीव बादशहा पायदळ, स्वार, तोफखाना, हत्ती व जनानखाना बरोबर घेऊन या मार्गाने मोठ्या थाटानें इ० स० १६६४ त जात असतां पोशिन व अलियादसराई यांच्या दरम्यान एका हत्तीचा पाय निसरून तो त्याच्या मागल्याच्या आंगावर घसरला; तेव्हां तो जाऊन तिस-यावर पडला. याप्रमाणे, पंधरा हत्ती एकमेकांवर आदळत कड्याच्या तळास लोटांगणे खात खाली गेले. त्यांतील. कांहींवर जनानखान्यांतील अंबला आरूढ होऊन चालल्या होत्या. त्यांची या भयंकर प्रसंगी काय अवस्था जाहली असेल याची वाचकांनीच कल्पना करावी; तरी वेळ चांगली होती. ह्मणून तिघीचौघीच प्राणास मुकल्या, नाहींतर सर्वांच्या हाडांचा चुराडा उडाला असता. प्रसिद्ध फ्रेंचप्रवासी जो बनियर तो या स्वारीबरोबर होता. वा मार्ग, याचे नांव अबटोबाद. वरील लोहमार्गावर हसनअबदल नांवाचे स्टेशन आहे. तेथून अबटोबाद चाळीस मैलांवर आहे. हे गांव हजारा प्रांताचें सिव्हिल स्टेशन आहे. तेथून ४५ मैलांवर हा मार्ग पहिल्या मार्गास दोमेल गांवाजवळ मिळतो. पांच सात वर्षांपूर्वी हाच वाहतां मार्ग होता. वर सांगि-