पान:काश्मीर वर्णन.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३ )


तलेल्या सर्व मार्गांनी जाणारांस केव्हा केव्हां एक मोठा अपघात होण्याचा संभव आहे. तो असा की, पाऊस पडत असतां किंवा पडून गेल्यावर कांहीं कालपर्यंत बाजूचे पर्वत चिरून त्यांची हत्तीसारख्या जनावरास खाली दडपून टाकणारी प्रचंड शकले मार्गावर येऊन पडतात.

मार्गक्रमण.

 रावळपिंडी येथे लोहमार्ग संपल्याचे पूर्वी सांगितलेंच आहे. येथून आह्मी सकाळचे अकरा वाजतां भोजन करून मरीस जावयास टांग्यांतून निघालो. मार्ग एकसारखा चढता लागला. याच्या दोहोबाजूस शिसव्याची झाडे लाविली आहेत. महासागराचा अफाट विस्तार, त्याची अगाध खोली, त्याजवरील प्रचंड लाटा, त्यांचा सिंहगर्जनेसारखा अतिघोर आवाज, त्याच्यांत संचार करणारे भयंकर नानाविध प्राणि, त्याजवरून दिसणारा भव्य देखावा, इत्यादि गोष्टींची यथार्थ कल्पना आगबोटींत बसून कांहीं जलपर्यटण केल्यावांचून जशी येत नाहीं तशीच महान् हिमाचल, त्याची बर्फाने आच्छादित वे गगनचुंबित शिखरे, त्यांचा आश्रय करू पाहणारे व हत्तीच्या आकारास तुच्छ मानणारे मेघसमूह, त्या शिखरांवरून उड्डाणे मारीत निरनिराळ्या वळणांनी खालीं येणारे जलौघ, त्यांजवरून सोसाट्याने वाहणारा अनिवार्य वायु, त्यास आडवू पहाणारे भव्य व उंच वृक्ष, त्या पर्वतांतील भयंकर खिंडी, पाताल फुटल्यासारखे त्यांतील अति खोल व विशाल दरे, कड्यांवरून त्या दऱ्यात निर्भयपणे संचार करणारे वनपशु, ह्या सर्वांच्या संयोगार्ने
 2