पान:काश्मीर वर्णन.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )

कारण,. हा मार्ग कोहालापासून बरामुलापर्यंत तिला डावी घालून जातो.
 आतां, राहिलेल्या दुस-या चार मार्गाविषयी थोडीशी माहिती देऊन आह्मी आमच्या मार्गक्रमण वर्णनाकडे बळू.२ रा, बनिहालमार्ग. हा बनिहाल नांवाच्या खिंडीतून जातो ह्मणून त्यास हे नाव पडले आहे. काश्मीर देशाची दुसरी राजधानी जम्मू सर्वास माहितच आहे, येथपावेतों लोहमार्ग आहे. तेथून इसलामबाद नांवाचे गांव १३० मैल आहे आणि तेथून श्रीनगर ३३ मैल राहते. या मार्गात लहान मोठी आठ नऊ खेडी लागतात. हा मार्ग पहिल्या मार्गापेक्षां कांहीं जवळ आहे, पण रस्ता जागोजाग फार वाईट असून चढउतार वारंवार लागतात. या मार्गाने गेल्यास अमरनाथाचे शिवस्थान पूर्वेस राहते. ३ रा, पुंचमार्ग, नार्थवेस्ट नांवाच्या लोहमार्गावर जेलम नांवाचे एक स्टेशन आहे. तेथून श्रीनगर १९९ मैल राहते. हा मार्ग एकशेचाळीस मैल जाऊन पुढे पहिल्या मार्गास उरी गांव मिळतो. या मार्गात ही चढउतार फार लागून रस्ता खराब असल्यामुळे मोठा त्रासदायक वाटतो, व कांहीं मुक्कामी प्रवाशांस लागणारे पदार्थही मिळत नाहीत. पण ह्या व पुढील मार्गावर वनश्री मात्र मोठी रमणीय दृष्टीस पडते. ४ था मार्ग, यास पंजार. असे ह्मणतात. कारण, हा पंजार ( पंजाल ) खिंडीतून जातो. वर सांगितलेल्या लोहमार्गावर गुजरात नांवाचे स्टेशन आहे. तेथून या मार्गास आरंभ होतो. हा मार्ग बराच जवळ आहे. पण मोठा बिकट आहे. कारण, दुस-या व तिसन्या मार्गाप्रमाणे