पान:काश्मीर वर्णन.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८४ )

कर्ता व किरातार्जुन काव्याचा टीकाकार, ९ श्रीवरपंडित राजतरंगिणीच्या तिसऱ्या भागाचा कर्ता यानें योगवासिष्ट ग्रंथ राजास सांगितला. हे सर्व पंडित राजाच्या आश्रयास होते. राजानें कांहीं संस्कृत ग्रंथांचे तरजुमे पार्शी भाषेंत करविले. यास गाणें मोठें प्रिय असून त्या कलेच्या शाळा यानें स्थापिल्या होत्या. तानसेनाच्या खालोखाल वकसू नांवाचा प्रसिद्ध गवयी या वेळी होता. या राजास रत्नाची एक खाण सांप- डली होती. तींतील रत्नांस जैनमणी ह्मणतात. ते माणकासारखे लाल असतात. याच्या वेळी देशांत एक मोठा दुष्काळ पडला. पुढें अतिवृष्टि होऊन नद्यांच्या तीरचे कित्येक गांव वाहून गेले. या दैवि संकटांनी हजारों लोक उपाशी मरूं लागले. तेव्हां राजानें आपलीं धान्याची कोठारें उघडून धान्य वाटलें आणि लोकांचे प्राण वांचविले. पुढें एक उच्च स्थळ ( पाहून त्याजवर राजानें जैनतिलक नांवाचें एक शोभि- वंत शहर वसविलें. तो ब्राह्मणांवर मोठें प्रेम करो व वितस्तेचा उत्साह करवी. याप्रमाणे यानें इ०स० १४१७ 'पासून १४६७ पर्यंत राज्य केलें.. याच्या मागून-
 हैदरशहा, हसन, महंमद, फत्तेशहा, नानू- शहा, मिरजा हायदर व हुमेयून असे अनुक्रमें सात राजे झाले. त्यांत हैदरशहा मोठा जुलमी व अविचारी असून मद्यप्राशनांत सर्व वेळ निमग्न असे.. त्यानें कित्येक लोकांचीं नार्के व कान कापून त्यांचे दुसरे अव- यव छिन्न विछिन्न केले. याच्या दुराचरणानें सर्व लोक अत्यंत त्रस्त होऊन देशांत धामधूम चालू झाली.