पान:काश्मीर वर्णन.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८३ )

यास सहन न होऊन त्यानें आणखी चार नोडगे मिळवून त्यांच्या सहायानें त्या योग्यास बाणानें ठार मारिलें. हैं वर्तमान राजास समजून त्यास फार वाईट वाटले आणि त्याने त्या दौलाची धिंड काढिली. याची जैनधर्मा- वर मोठी भक्ति होती. यानें कालवे काढून पुष्कळ जमीन सुपीक केली, मठ बांधिले, अग्रहार करून दिले व अन्नसत्रे घातलीं. तो आपल्या लोकांचा पक्षपात करीत नसे. एका चोरानें जयापीडपूर येथें राहणाऱ्या एका ब्राह्मणाची गाय चोरून मडव राज्यांत नेली होती. पुढें कांहीं वर्षांनी तिचा पत्ता लावून ती मालकानें ओळ खिली. चोर ती आपली ह्मणून वाद करूं लागला. हैं भांडण राजाकडे आलें. काश्मीरांतील गाई शिंगाडे खातात. त्याप्रमाणें त्या गाईनें शिंगाडे खाल्ले; पण तिचीं वासरे ते खाईनांत यावरून ती गाय ब्राह्मणाची असें ठरवून चोरास शासन केलें. हा राजा योगी लोकांस मान देत असे. याच्या हातास एक विषारी फोड झाला होता तो बरा होईना. तो शिवभट्टानें बरा केला. हा भट्ट शाबरी मंत्रांत मोठा प्रवीण होता. राजानें या भट्टास पदरीं ठेवून घेतलें होतें. हा राजा विद्वानांचा मोठा पुरस्कर्ता असल्यामुळे, १ रामानंद ( टीकाकार ), २ सौगत (धर्मशास्त्रवेत्ता ), ३ कर्पूरभट्ट ( वक्ता ), ४ रूपयभट्ट ( गणिती ), ५ नोथसोम यानें जैनांचें चरित्र संस्कृत व देशभाषेत लिहिलें आहे, ६ योद्धभट्टानें देशभाषेत जैनप्रकाश नांवाचें नाटक लिहिलें, ७ भट्टावतार यानें जैनविलास नांवाचें नाटक लिहिलें, ८ जोनराज कवि राजतरंगिणीच्या दुसऱ्या भागाचा