पान:काश्मीर वर्णन.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८५ )

राज्यास दुश्चिन्हें होऊं लागलीं. धूमकेतु दिसूं लागला.धरणीकंप झाला. भरदिवसा सिंह, अस्वले इत्यादि हिंसक पशु गांवांत संचार करूं लागले.शहरांत एका हवेलीस आग लागून ती जळत होती,तरी याची मद्य- प्राशनलीला चालूच होती. यानें सारें दोन वर्षे राज्य केलें.नंतर हसनशहा गादीवर बसला. ह्याच्या वेळीं श्रीवर पंडित हयात असून राज्याच्या उलाढालींत त्याचें बरेंच अंग असे. या राजास पुढें धनलोभ फार सुटला. तेव्हां त्यानें एका श्रीमान् सावकारास लुटून एक कोट रुपये आणिले आणि त्यास कैदेंत टाकिलें. पुढें तो सावकार कैदेंतच मरण पावला. याच्या वेळीं सय्यद लोक मोठे उन्मत्त होऊन प्रजेस फार पीडा देऊ लागले. याच्या कारकीर्दीची वाचण्यासारखी बरीच कथा दिली आहे. पण ग्रंथविस्तारभयास्तव आह्मीं येथेंच अटोपते घेतों. यानें बारा वर्षे राज्य केलें. नंतर ह्याचा पुत्र महमदशहा यास मंत्र्यांनीं गादीवर बसविलें. तेव्हां तो सात वर्षांचा होता. हा गोनर्दा- प्रमाणें रूपवान् होता. राजा अल्पवयी असून मंत्री चांगले नसल्यामुळे राज्यांत एकसारख्या लढाया व दंगे चालू होते. त्यामुळे हजारो लोक प्राणास मुकले. याचें कारण या वर्षी मंगळ राजा व गुरु आणि शनी यांची युती होती, असें ग्रंथकार ह्मणतो. वर सांगि- तल्याप्रमाणें राज्यांत एकसारखा घोटाळा चालू होता. पुढें या राजास पदच्युत करून त्याचा चुलता फत्तेशहा गादीवर बसला. पण राज्यांतील दंगे व बखेडे अधिक दुणावत जाऊन अखेर महमदशहा फत्तेशहास काढून