पान:काश्मीर वर्णन.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८२ )

त्याच्या खुणा सांप्रत काळी सुद्धां श्रीनगरांत व अन्यत्र जागोजाग दृष्टीस पडत असल्याचें पूर्वी सांगितलेच आहे. तो आपल्या धर्माच्या लोकांवर विशेष प्रेम करूं लागला. त्यामुळे ते इतके श्रीमान् झाले कीं, त्यांस कोट रुपये कवडीप्रमाणें वाटू लागले. त्याप्रमाणेंच ते मोठे शिर- जोर होऊन हिंदूंस फार छळू लागले. तेव्हां कित्येक हिंदू मुत्सद्यांनी आपणांस यवनी नांवें धारण केलीं. यांत | विशेष आश्चर्य करण्यासारखी अशी एक गोष्ट होती कीं, या काली सूहभट्ट नांवाचा एक मंत्री जातीचा ब्राह्मण असून त्यानें देवालयांचा समूळ नाश व हिंदूंचा छळ करण्याच्या काम होईल तेवढी मदत केली. या बादशहानें २४ वर्षे राज्य केलें. नंतर अल्लीशहा गादीवर बसला. याच्या वेळीही सुहभट्ट हा एक मंत्री असून पूर्वीप्रमाणें तो हिंदूंचा छल करण्यांत पुढारी असे. पण प्रजेच्या पुण्यानें त्यास क्षय लागून तो मरण पावला. अल्लीशहाच्या मागून शिकंदरचा दुसरा पुत्र-
 जैनभूपति (जैनुल्लाभदीन ) हा गादीवर बसला. तो बापाच्या अगदी उलट स्वभावाचा ह्मणजे मोठा गुण- ग्राही, दाता व न्यायी होता. धर्माच्या कामांत तर अकबर बादशहाप्रमाणें त्याची समदृष्टि होती. याच्या ari मक्केहून एक दौला पुष्कळ पुस्तकें बरोबर घेऊन काश्मीरास आला. राजानें त्याचा मोठा सत्कार केला. पण येथें एक महान् योगी होता, त्याच्या आशीर्वादानें राजास आदमखान, हाज्यखान,जस्सरथखानबहिरामखान असे चार पुत्र झाले.ही गोष्ट दौला