पान:काश्मीर वर्णन.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८१ )

शहाणी होती. तिची हिंदुधर्मावर मोठी भक्ति असे. हा राजा एके वेळीं शिकारीस गेला असतां एक सिंह त्यास खालीं पाडून त्याचे छातीवर बसला. तेव्हां मदन- लाविक नांवाचा सरदार बरोबर होता. त्यानें सिंहाचे आपल्या तरवारीनें तुकडे केले. राजानें त्याजला पाहिजे तितकें द्रव्य देऊन त्यास दिल्लीच्या मांडलिकाकडे राहण्यास पाठविलें. कारण जवळ ठेविला तर दुष्ट व चहाडखोर लोक आपल्या व त्याच्यामध्यें वैमनस्य उत्पन्न करतील. यानें स्वप्नांत सोन्याची एक नगरी पाहिली. तींतील घरें ओस पडली होतीं. एका वाड्यांत मात्र एक प्रेत असून जवळ एक स्त्री उभी होती. हें प्रेत बादशहाचें होतें व थोडे दिवसांत तो परत येणार आहे ह्मणून तिनें सांगितलें. हें स्वम पाहून त्यानें लासाच्या सांगण्या- वरून जे पुत्र बाहेर हाकून दिले होते, त्यांस परत बोलाविलें. पण ते परत येण्याचे अगोदरच हा मरण पावला. याने १८ वर्षे राज्य केलें. नंतर याच्या मागून याचा बंधु कुतुबुद्दीन याचा पुत्र शिकंदरअल्लीशहा हे अनुक्रमें गादीवर बसले. त्यांत-
 शिकंदर यानें ओरंगजेबप्रमाणे हिंदूंचा व त्यांच्या धर्माचा अतिशय छळ केला. त्यानें शेंकडों देवालयें पाडून त्यांतील मूर्ती छिन्न विछिन्न केल्या आणि आपणांस बुतसिकन् ( मूर्ती फोड्या ) असा किताब मिळविला. त्याच्या अनुयायी लोकांनीं धर्म वेडाने व कांही अंशी त्यास खुष करण्याच्या बुद्धीनें या कामों त्याचें चांगलें अनुकरण केलें. त्यामुळे या वेळी हिंदूंच्या देवालयांचा व त्यांतील मूर्तीचा जो भयंकर नाश उडाला,
 16