पान:काश्मीर वर्णन.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८० )

करून आंत पाहूं लागला. पाण्यांत तसें प्रतिबिंब दिसूं लागलें. तेव्हां आपणास आंतून कोणी वेडावून दाख- वीत आहे, अशी कल्पना करून त्यानें त्याच्या ( आपल्या ) तोंडांत मारिली. असा तो मूर्खशिरोमणी असल्यामुळे त्यास मूर्खराज ह्मणत, असें जोनराज कवि लिहितो. रिंचण हा भोट्ट देशाच्या राजाचा पुत्र होता. वर सांगितलेल्या राजांच्या पश्चात् हें राज्य मुसलमान लोकांनी बळकाविलें. त्यांत-
 शहामीर हा पहिला राजा. तो पूर्वीच्या राजाचा मंत्री होता. त्याच्या मागून त्याचे पुत्र जमशेरअल्लाउद्दीन, नंतर त्याचा नातू शहाबुद्दीन हा चौथा राजा झाला. तो मोठा पराक्रमी निघाला. त्यानें उत्तरेकडील राज्यावर स्वारी केली. तेव्हां तेथील राजा यास शरण आला. पुढें त्यानें दुसरी स्वारी सिंध देशावर केली. तेथील राजाजवळ याच्या मागण्याप्र- मार्णे देण्यास खंडणी नव्हती, ह्मणून त्यानें आपली अति रूपवति कन्या यास दिली. त्यानें गंधारदेश जिंकिला व गिझनीवर स्वारी केली, तेथील राजा यास शरण आला. हा दक्षिणेस सतलज नदीपर्यंत आला होता. यास परदेशांवर स्वाऱ्या करणें फार आवडे. यामुळे याला स्वदेश परका झाला होता. जार लोकांचा तो मोठा शास्ता होता. याचे मंत्री कोटभट्टोदय आणि सैनिक चंद्रडामर व लौल हे होते. हा मोठा शहाणा होता. याची पहिली बायको उदयश्री असतां, लासा नांवाचीं अति रूपवति याची भाची होती तिला यानें दुसरी बायको केली. उदयश्री ही मोठी गुणी व