पान:काश्मीर वर्णन.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७८ )

लोक जवळ बाळगिले. इंग्लंदच्या इलिजाबेथ राणीच्या वेळीं अनेक विद्वान् प्रख्यातीस आले, ह्मणून त्या कालास जसे गोल्दन् एज ( सुवर्णकाळ ) झणतात, तसे अनंतदेव राजापासून जयसिंव्ह राजापर्यंतच्या कालास आह्मी तेंच नांव देतों; कारण त्यांच्या वेळीं शेंकडों पंडित उदयास आले व त्यांतील कित्येकांस राजाश्रय होता. या काली या देशी असा नियम होता कीं, ज्यास पंडित हें पद मिळविण्याचें असेल त्यानें विद्वानांच्या पसंतीस उतरेल असा अलंकार किंवा दुसऱ्या शास्त्रावर एकादा ग्रंथ लिहिला पाहिजे. या नियमास अनुसरून मंख नांवाच्या कवीनें श्रीकंठचरित्र ( त्रिपुरव- (घवर्णन ) ग्रंथ लिहिला आणि त्याचें परीक्षण करण्या- 'करिता तो त्याचा वडील बंधु अलंकार (लंकक ) याज- कडे दिला. अलंकार हा राजाचा मंत्री होता. त्यानें तो त्यावेळी असलेल्या पंडितांपैकी तीस जणांस दाख- विला. त्या सर्वांस तो मोठा पसंत होऊन मंखाची फार वाहवा झाली. आतां वर सांगितलेल्या तीस पंडि- तांतील कांहींविषयी थोडी माहिती खाली देतों. मंख हा पिढिजाद पंडित होता इतकेंच नाहीं, पण त्याच्या कुटुंबांतील सर्व लोक मोठे विद्वान् होते. याचा पिता विश्ववर्त, आजा मनोरथ, बंधु शृंगार, भंगअलंकार हे सर्व प्रसिद्ध पंडित होते. चतुष्टयांचा गुरु रुय्यक नांवाचा एक महान् पंडित होता, त्यानें काव्य- प्रकाशसंकेत, श्रीकंठस्तव व जल्हणकविकृत सोमपाद- विलासकाव्य याजवर अलंकारानुसारिणी नांवाची टीका हे ग्रंथ लिहिले आहेत. जल्हण हा वर सांगितलेल्या