पान:काश्मीर वर्णन.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७७ )

जो परमाडी याची चंदला नांवाची राणी अति रूप- वति असल्याचें वर्तमान हर्षास कळून तो कामातुर झाला आणि तिच्या प्राप्तीकरितां त्यानें त्या देशा- वर स्वारी केली पण तींत त्याचा फार नाश झाला. याप्रमाणें या राजाची कारकीर्द जितकी स्तुतीस तितकीच निंदेस पात्र होऊन अखेर याचा अंत जसा शोचनीय झाला, तसा दुसऱ्या कोणत्याही राजाचा झाला नाहीं. याच्या मागून उदयविक्रम, सांख्यराज, सल्हण ( उदय- विक्रमाचा नातू ), सुस्सलमलीन हे अनुक्रमें गादीवर वसले. नंतर सुस्सलाचा पुत्र -
 जयसिंह राजा झाला- हा मोठा पराक्रमी होता. त्यामुळे यास सर्व राजे भीत असत. दातृत्वा- विषयीं याची फार ख्याति होती, यानें आपल्या सचीवांस पुष्कळ संपत्ति देऊन प्रतिराजे बनविले. याच्या व मागील कारकीर्दीत सुज्जी नांवाचा एक मंत्री होता. तो मोठा पराक्रमी असून त्यानें राज्यांत अनेक उलाढालीचीं कामे केली. राजा या मंत्र्याचा द्वेष करूं लागला. राजा- जवळ दोन पराक्रमी पुरुष होते. या दोघांनी सुज्जी बेसावध असतां त्यास व त्याच्या पक्षाच्या दुसऱ्या लो- कांस ठार मारिलें. सुज्जीचा वध करविल्याबद्दल राजास पुढे मोठा पश्चात्ताप होऊन राज्यास उतरती कळा ला- गली. या राजानें अनेक मठ, देवालयें व कालवे बां- धिले व कांहींचा जीर्णोद्धार केला. हा राजा अवंतिवर्माललितादिस यांच्याहीपेक्षां अधिक धर्मशील होता. यानें यज्ञ केले, किती एकांची लग्ने केलीं, कित्येकांस घरे बांधून दिलीं, ब्राह्मणांस अग्रहार दिले व विद्वान्