पान:काश्मीर वर्णन.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७६ )

केल्या होत्या. महान्कवि शंभु व दुसरे पंडित याच्या पदरी होते. राजेंद्रकर्णपूर व अन्योक्तिमुक्तालता नांवाचे ग्रंथ शंभूनें लिहिलेले प्रसिद्ध आहेत. राज्य- कारकीर्दीच्या आरंभी हर्ष राजा न्यायाविषयीं इतका दक्ष असे कीं, अर्जदारांची दाद जलदी लागावी ह्मणून त्यानें शहराच्या चारी वेशींवर घंटा टांगून ठेविल्या होत्या. तसेंच याच्या जवळ जे याचना करीत ते दारिद्र्यमुक्त होत, असें याचें औदार्य होतें. नोनक नांवाचा ह्याचा एक मंत्री होता. त्यास दूर करून त्याच्या जागीं त्यानें आपला बंधु विजयमल्ल यास नेमिलें. पुढें विजयमल्लाचे मनांत मत्सर उत्पन्न होऊन राज्य बळ - काविण्याचें आलें. तेव्हां त्यानें यज्ञ आरंभिला आणि त्यांत राजास मारण्याचा बेत करून त्यास यज्ञास बोला- विलें. विजयमल्लाच्या पापबुद्धीचा हर्षास संशय आला आणि कांहीं चांगले योद्धे बरोबर घेऊन तो यज्ञास गेला. पुढें दोवांत संग्राम होऊन विजयमल्लाचा परा- जय झाला. तेव्हां तो बायकोस घेऊन लाहोराकडे पळून गेला. हर्ष राजा मोठा भव्य पुरुष होता. त्यास कर्नाटकी उंच कपडे वापरण्याची फार आवड असे. दीपवाळींत पदरच्या लोकांस कुणबिणीकडून ओवाळण्याची चाल यानेंच चालू केली. चालुक्य देशाच्या परमाडी राजानें बिल्हण कवीस छत्र दिल्याचें वर सांगितलेंच आहे. हें वर्तमान हर्षास कळलें तेव्हां त्यानें आपल्या पदरच्या सर्व पंडितांस तशीं छत्रे दिली. पुढें हा राजा अति दुर्वृत्त निघून त्यानें अनेक गर्हणीय कृत्ये केल्याचें पूर्वी सांगितलेंच आहे. वर सांगितलेला