पान:काश्मीर वर्णन.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७५ )

होऊन त्याने बंड केलें. उत्कर्षाच्या आंगी शौर्य- गुणाचा अभाव असल्यामुळे तो भयाभीत होऊन जनान- खान्यांतील सहजा नांवाच्या राखेस बरोबर घेऊन एका दिवाणखान्यांत जाऊन बसला आणि पुढें परिणाम नीट दिसत नाहीं असें वाटून त्यानें आत्महत्या केली. या वेळीं एक चमत्कार घडला तो असा कीं, राजाच्या खुद्द राणीनें परपुरुषाचा हात धरिला, पण सहजा राखेनें त्याच्या चितेत उडी टाकून सहगमनाचें पुण्य मिळविलें व विवाहित स्त्रियांस खालीं पाहण्यास लाविलें. उत्कर्ष हा सारे तीन आठवडे नांवाचाच राजा होता. पुढें विजयमल्लाच्या सहाय्यानें—
 श्रीहर्ष गादीवर बसला. त्याच्याविषयीं कल्हण याने लांबच लांब वर्णन दिले आहे. याचें चरित्र मोठें विस्मय करण्यासारखें आहे. हा राजा विधात्यानें सद्गुण आणि दुर्गुण यांचा पुतळा निर्माण केला होता असें ह्यटलें असतां चालेल. त्यानें आरंभी देवालयें व धर्मशाळा बांधिल्या. दानधर्म केला.अग्रहार करून दिले. मोठा राज्यांत अनेक सुधारणा करून प्रजेची सुखसाधनें वाढविली. या गुणांवरून त्याची उत्तम राजांत गणना करावी हें योग्य. पण त्या बरो- बरच पुढें त्यानें पुष्कळ देवालयें, धर्मशाळा व मठ यांचा सत्यानाश केला. रयत अनेक प्रकारें लुटली व अखेर पुष्कळांचे प्राण हरण केले. व्यभिचार संबंधाने ह्याचें आचरण तर फारच निंद्य होतें. असो, हा राजा मोठा विद्वान् असून त्यास पुष्कळ भाषा येत होत्या. यास गायनकला मोठी प्रिय असून तिजवर त्यानें कांहीं कविता