पान:काश्मीर वर्णन.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७४ )

त्यांची विद्वत्ता, तसेंच उन्हाळ्यांत तेथील हवेचा थंडपणा व उपवनांची शोभा यांची बिल्हण तारीफ करून आपल्या गांवचें वर्णन करितो. त्याच्या गांवाच्या एके बाजूस केशराच्या सुंदर बागा व दुसरे बाजूस द्राक्षवेली असून तें गांव हिमाचलरूपी स्त्रीच्या वक्षस्थलावर लीलापर एक भूषण होतें असें तो बिल्हण म्हणतो. तो पिढीजाद पंडित होता. त्याच्या पित्याचें नांव ज्येष्ठकलश व मातेचें नांव नागादेवी होते. ज्येष्ठकलश यानें महाभाष्यावर टीका लिहिली होती. यास इष्टराम, विल्हणआनंद असे तीन पुत्र होते. बिल्हणानें आपला वडील व धाकटा बंधु यांच्या विद्वत्तेची मोठी प्रशंसा केली आहे. बिल्हण लहान असतां घरांत वेदशास्त्रांचा अभ्यास करून पुढे देशाटन करावयास निघाला. तो मथुरेस गेला आणि तेथें त्यानें अनेक पंडित जिंकिले. तेथून कनोज, प्रयाग, काशी, सोमनाथ इत्यादि तीर्थे करून तो सोमनाथाजवळ गलबतांत बसून कोकणांत गोकर्णा- जवळ उतरला. तेथून फिरत फिरत रामेश्वरास जाऊन पुनः परतला आणि दक्षिणेस चालुक्य देशाचा राजा जो परमाडी याच्या येथे गेला. राजानें त्याचा मोठा सन्मान करून त्यास छत्र व हत्ती बक्षीस देऊन विद्या- पति असा किताब दिला. तो भोजराजाचा समकालीन होता, पण त्याच्या दरबारी कधीं गेला असल्याचा लेख मिळत नाहीं. त्याने विक्रमांकदेवचरित्र, कर्णसुंदरी व चौरपंचाशिका हे ग्रंथ लिहिले, ते प्रसिद्ध आहेत. असो. कलश उत्कर्ष यास गादीवर बसवून मरण पावला. ही गोष्ट हर्षाचा धाकटा बंधु विजयमल्ल यास सहन न