पान:काश्मीर वर्णन.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७३ )

नंतर अनंतदेव आपल्या राणीस बरोबर घेऊन विजय नांवाच्या क्षेत्रीं जावयास निघाला असतां मार्गांत पद्मपूर येथें त्याचे लोक येऊन त्यास भेटले आणि ह्मणाले कीं, तूं जें कृत्य केलें त्याचें हें फळ आलें. पुढें राजा वरील क्षेत्रांत जाऊन राहिला. तेथें त्यास पैशाची फारच अडचण पडली. तेव्हां त्यानें जवळ असलेले एक रत्नलिंग सात लक्ष दिनारांस विकलें. राजा व राणी या क्षेत्रीं राहात असतां कलशानें त्यास आग लाविली आणि तो मोठा आनंद मानूं लागला. राजा व राणी नदी उतरून जाऊन त्या संकटांतून सुटका पावलीं. याप्रमाणें हा राजा व त्याचा पुत्र यांविषयीं लांब कथा दिली आहे. अखेर अनंतदेवानें राणीवर रागावून आत्महत्या केली. जनरल कर्निंग- हामच्या ह्मणण्याप्रमाणें यानें इ० स० १०२८ पासून १०८० पर्यंत राज्य केलें, पण बुईलसनच्या मताप्रमाणें यानें २२ वर्षे राज्य केलें. या मताप्रमाणें पित्याच्या पश्चात् कलशानें राज्योपभोग आठच वर्षे केला. कलश यास उत्कर्ष, हर्ष व विजयमल्ल असे तीन पुत्र होते.
 बिल्हण नांवाचा प्रसिद्ध कवि या राजाच्या कारकी- दस कंटाळून देशांतर करण्यास निघाला. याची जन्मभूमि सोणमुख नांवाचें गांव वितस्ता आणि सिंधु या नद्यां- च्या संगमाजवळ मवरपूर नांवाची काश्मीरची एक जुनी राजधानी होती तिजपासून तीन मैलांवर आहे. ही राजधानी कुबेराची अलकावति किंवा रावणाची लंका ह्यांपेक्षां अधिक शोभिवंत होती. काश्मीरांतील ब्राह्म-णांचा पवित्रपणा व त्यांचें ज्ञान, तेथील स्त्रियांचे सौंदर्य व