पान:काश्मीर वर्णन.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७१ )

तीचा भाऊ) हा भोज राजाप्रमाणें कवींचा मोठा आश्रयं- दाता असून योद्धा होता. अनंत राजानें विजय क्षेत्रांत अग्रहार करून दिले. तसेंच त्याची राणी सूर्यवति हिनें आपल्या नांवाचें एक विद्यालय व एक शिवालय बांधिलें. या राजाच्या पदरीं क्षेमेंद्र, सोमदेव व दुसरे जाडे पंडित. होते. क्षेमेंद्राच्या पित्याचें नांव प्रकाशेंद्र होतें. त्यानें अलंकार शास्त्राचा अभ्यास अभिनवगुप्ताचार्य याज - पाश केला होता. क्षेमेंद्रानें अलंकार व दुसरी शास्त्रे यांजवर इतके ग्रंथ लिहिले आहेत कीं, त्यांवरून त्यास व्यासाचा अवतार झणूं लागले. पण त्यानें शालीन- तेनें व्यासदास असें नांव घेतलें. त्यानें केलेले अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांत बौद्धावदानकल्पलता, कलाविलास, समयमातृका, दशावतारचरित्र, शशिवंश- महाकाव्य, भारतमंजरी व चित्रभारत नाटक इत्यादि प्रसिद्ध आहेत. सोमदेवभट्टानें कथासरित्सागर ग्रंथ राणी सूर्यवतीच्या आज्ञेनें लिहिला ; ह्या ग्रंथाला आधार बृहत्कथा. याचा कर्ता गुणाढ्य पंडित होय. तो शक- कर्ता (सातवाहन ) शालिवाहन याचा मंत्री होता. त्यानें पिशाच भाषेत सात लक्ष ग्रंथ लिहून त्यास बृह-- कथा असें नांव दिलें होतें. पण त्यांपैकी सहा लक्ष ग्रंथ त्यानेंच जाळून टाकिला. अशा अमोल्य वस्तूचा नाश करण्यास त्यास कारण काय झालें, त्याची सुरस कथा पंडित वामन शास्त्री इसलामपूरकर यांनीं आपल्या बृहत्कथासागर ग्रंथाच्या पहिल्या भागांत दिली आहे. बाकी राहिलेल्या एक लक्ष ग्रंथाचा क्षेमेंद्रानें राजाच्या सांगण्यावरून सारांश घेऊन संस्कृतांत बृहत्कथामंजरी