पान:काश्मीर वर्णन.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७० )

कैय्यद काशी क्षेत्रीं गेला आणि तेथें सभेत त्यानें अनेक पंडित जिंकिले. भाष्यप्रदीप नांवाचा ग्रंथ त्यानें या क्षेत्री असतेवेळी लिहिला. तसेंच श्रीहर्ष कवीनें नैषव काव्य लिहून तें त्याचा मातुल मम्मट यास दाख- विलें. तेव्हां मातुलानें त्या काव्याच्या गुणदोषाविषयीं त्यास जें उत्तर दिलें ती आख्यायिका विद्वज्जनांस माहि- तच आहे. कैय्यर, मम्मट, उब्वटजय्यट हे महान् पंडित चंद्रादित्य नांवाच्या पंडिताचे पुत्र होते असें कोणी ह्मणतात. तसेंच "कैय्यटो जय्यटात्मजः" हें वाक्यही ऐकण्यांत येतें पण या सर्वांस कांहीं आधार मिळत नाही. येथें थोडेसें विषयांतर झालें. करितां आतां मुख्य वर्णनाकडे वळू. हरिराजा नंतर —
 अनंतदेव यास त्याचा मातुल सागर व दुसरे मंत्री यांनी तो लहान असतां गादीवर बसविलें. पुढें तो प्रौढ झाल्यावर मोठा प्रतापी, गुणग्राही व धार्मिक निघाला. त्यानें जालंदरचा राजा इंदुचंद्र याच्या कन्या सूर्यवतीइंदुमुखी यांस आपल्या बायका केल्या. पहिलीवर त्याचें विशेष प्रेम होतें. त्यानें साकसदरद लोकांबरोबर युद्ध करून जय मिळ- विला आणि चंपा, दावाभिसारत्रिगर्त या देशांवर आपला अंमल बसविला. यात्रे त्रिभुवनकंप- नाधिपतीशी युद्ध झालें. त्यांत त्यास पुष्कळ जखमा. लागल्या. तरी अखेरीस त्यानें त्रिभुवनाचा पराभव केला. त्यानें इतके वीर मारिले की, त्यांच्या रक्तानें त्याच्या हातांतील तलवार चिकटली ती मोठ्या युक्तीनें काढावी लागली. याचा मेहुणा क्षितिपति (सूर्यव