पान:काश्मीर वर्णन.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( १६९ )

दिद्दा ही लाहोरच्या सिंह राजाची कन्या होती. पर्वगुप्तक्षेमगुप्त हे अति वाईट राजे झाले. त्यांनी जीं दुष्ट कृत्ये केलीं त्यांचे कल्हणानें तिरस्कारबुद्धीनें वर्णन दिलें आहे. पर्वगुप्ताचाही अंत वरील राजा- प्रमाणे होऊन क्षेमगुप्त राजा झाला. यानें बौद्धांच्या अनेक विहारांचा नाश केला. त्याची राणी दिद्दा ही भर्त्याप्रमाणे मोठी दुष्ट व दुराचारिणी होती. तिचा नातू जो नंदिगुप्त यास ठार मारून तिनें राज्यकारभार आपल्या हातीं घेतला.
 प्रसिद्ध पंडित जो कैय्यद तो वर सांगितलेल्या भीमगुप्ताच्या वेळीं होता. या पंडिताविषयीं एक आख्यायिका ऐकण्यांत आली ती येथे देतों. तो पांपूर येथें राहणारा असून फार दरिद्री होता. त्यानें व्याक- रण महाभाष्याचा अभ्यास इतका उत्तम केला होता कीं, जी स्थलें मोठ्या वैय्याकरण्यास कठीण वाटली होती, ती यानें सोप्या रीतीनें लावून दाखविलीं आहेत. एके वेळी कृष्णभट्ट नांवाचा एक दाक्षिणात्य पंडित काश्मीरांत गेला होता तो याच्या भेटीस गेला. तेव्हां कैय्ट घरांतील कांहीं काम करीत असून हातांत पुस्तक घेतल्यावांचून भाष्यांतील मोठे चिकट भाग छात्रवर्गास पढवीत होता. ही त्याची अलौकिक विद्वत्ता व दरिद्रावस्था पाहून कृष्णभट्टास मोठा विस्मय वाटला. पुढे तो तेथील राजाकडे गेला आणि त्याजकडून एक गांव व कांहीं धान्य यांच्या नेमणुकीची सनद मिळवून ती कैय्यदास आणून देऊं लागला. पण प्रतिग्रह निषेध धरिला असल्यामुळे त्यानें ती घेण्याचें नाकारिलें. पुढें
 15