पान:काश्मीर वर्णन.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १६८ ) घेतल्या. पुढें कांहीं निमत्त करून बाहेर येऊन राजानें सावकाराची आंगठी खूण ह्मणून आपल्या चाकरात्ररो- बर सावकाराच्या मुनिमाकडे पाठवून त्याच्या वह्या आणविल्या आणि त्या तपासल्या. तेव्हां सावकारानें केलेली लबाडी उघडकीस आली. पुढे ती बाग राजानें ब्राह्मणास देऊन सावकारास मोठा दंड केला. याप्रमाणे हा राजा प्रथम मोठा न्यायमार्गानें चालत होता पण पुढे याची चाल बिघडली. त्यास डोंब लोक प्रिय वाटूं लागले. लल्ला नांवाची एक वेश्या होती, तिला राजानें आपली पट्टराणी केली. ती अति रूपवति होती राजा जरी तिजविषयों इतका फिदा होता तरी ती एका चांडाळाबरोबर जात असे. त्या चांडाळाने तिच्या द्वारें राजाची बायको उपभोगास मिळविली. हाड्डी नांवाचा एक अधिकारी होता, त्यानें यांच्या णांवरून त्यांचें एककूट असल्याचें ओळखिलें. पुढे हें वर्तमान राजास कळून त्यास अति वाईट वाटलें. तेव्हां त्यानें आपलें बहुतेक राज्य ब्राह्मणांस अग्रहार रूपानें देऊन तो बैरागी होऊन गेला. यानें आर्य देशाच्या खाणाखु- विद्यार्थ्यांस एक मठ बांधून दिला. अखेर हा . याच्या राजा उदर होऊन इंद्राच्या भेटीस गेला. मागून संग्रामदेव, पर्वगुप्त, क्षेमगुप्त, अभिमन्यु, नंदि- गुप्त, त्रिभूवन, भीमगुप्त, दिद्दाराणी, संग्रामदेव याचा पुत्र हरिराज हे अनुक्रमें गादीवर बसले. राजा झाला, पण थोड्याच काळांत पर्वगुप्तानें त्यास ठार मारून राज्य आपण बळकाविलें. संग्रामदेव त्या वेळी त्याची

राणी त्रैलोक्यदेवी सति गेली. क्षेमगुप्ताची राणी