पान:काश्मीर वर्णन.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६७ )

सोमपानासारखें मानण्यास लाविलें. पुढे चांडाळणीशी संग केल्याबद्दल राजास पश्चात्ताप झाला. तेव्हां या पापाच्या क्षालनार्थ त्यानें एक अति पवित्र ब्राह्मण स्त्रीशीं संग केला. याच्या वेळी ब्राह्मण इतके नीच झाले कीं, त्यांनी राजास बायका देऊन इनामें मिळविली. एके दिवशीं राजा हंसीस घेऊन निजला असता त्यास तिच्यासह डोंचांनी बिछान्यावर ठार मारिलें. हा तीन वेळ राज्यभ्रष्ट होऊन पुन: गादीवर बसला होता. याच्या नंतर शूरवर्मा, पुनः पार्थ, शंकरवर्धन, उन्मत्तिवर्मा व पुनः शूरवर्मा हे अनुक्रमें गादीवर बसले. यांच्या मागून-

यशस्कर यास लोकांनी गादीवर बसविलें. हा

राजा मोठा धार्मिक, नीतिमान् व गुणग्राही होता. याच्या वेळी एक ब्राह्मण कर्जानें पीडित झाला असतां बाय- कोच्या निर्वाहार्थ एक मळा ठेवून बाकीची सर्व माल- मत्ता त्यानें मळारहित करून सावकारास दिली आणि आपण पैसा मिळविण्यास परदेशी गेला. इकडे साव- कारानें रहित शब्दाचा सहित करून तो बाग त्या ब्राह्मणीपासून काढून घेतला. तेव्हां ती एकाच्या घरीं चाकरीस राहिली. पुढें बराच काळ गेल्यावर तो ब्राह्मण कांहीं पैसा मिळवून स्वदेशी परत आला आणि पहातो तों आपली बाग सावकारानें घेतली व बायको लोकांच्या घरीं चाकरी करीत असून कृश झाली होती. तेव्हांत्यानें सावकारावर फिर्याद केली. राजानें सावकारास कचेरींत आणविलें आणि कचेरींत लोकांच्या व साव- काराच्या हातांतील आंगव्या पाहण्यास ह्मणून मागून