पान:काश्मीर वर्णन.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १६३ )

ह्मणजे झालें. अखेरीस राजाच्या छलानें ब्राह्मण अति त्रस्त होऊन संतापले आणि त्यांनी त्यास शाप दिले. त्यांच्या योगानें त्याचे पुष्कळ पुत्र मेले. शेवटी एका चांडाळानें राजावर बाण सोडिला. तो त्याच्या गळ्यांतून गेल्यामुळे तो प्राणास मुकला. त्याजबरोबर त्याच्या तीन राण्या सति गेल्या. उल्लेख आला आहे. याच्या वर्णनांत शालीचा यावरून त्या कालीं त्या देशांत त्या तयार होत होत्या असें अनुमान सहजच करितां येतें. याच्यामागून गोपाळवर्मा व संकट हे अनुक्रमें गादीवर बसले. संकट हा या घराण्यांतील शेवटचा पुरुष झाला. याच्यामागून शंकरवर्म्याची बायको जी सुगंधा राणी हिनें दोन वर्षे राज्याचा उपभोग केला. नंतर पार्थ व निजितवर्मा हे राजे होऊन पुढें - • चक्रवर्मा गादीवर बसला. तो मोठा उन्मत्त व दुराचारी होता. त्यास जार व जारिणी फार आवडूं लागल्या. एके दिवशीं एक डोंब तमाशेवाला आला. त्यास हंसी व नागलता नांवांच्या दोन मुली होत्या. त्यांचा तमाशा झाला. त्या मोठ्या देखण्या, गाणाऱ्या व नाचणान्या होत्या. त्यांस पाहून राजा व दुसरे सभा- सद कामातुर होऊन अगदी मोहित झाले. राजानें विचार केला की, त्यांच्या नेत्रकटाक्षांनी व आवाजांनी आह्मांस स्पर्श करावा तर त्यांच्या शरीरांनींच काय दोष केला आहे ! पुढें राजा दररोज त्यांचा तमाशा पाहूं लागला आणि त्या दोघीशिवाय त्यास चैन पडेनासें झालें. पुढें राजानें त्यांच्याशी संग केला आणि हंसी मुख्य राणी केली तेव्हां तिच्या उच्छिष्टास राजानें लोकांस