पान:काश्मीर वर्णन.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १६५ )

शंकरवर्मा गादीवर बसला. सुखवर्मा नांवाचा एक राजपुत्र होता. त्यास यानें युवराज नेमिलें. पुढें कांही दिवसांनीं राजा आणि युवराज यांजमध्ये मोठा कलह उत्पन्न होऊन राज्यांत चोहोंकडे फार बखेडा माजला. तेव्हां त्यानें युवराज, त्याचे अनुयायी व दु- सरे भाऊबंध यांस जिंकिलें व सिंधु नदीवरील देश काबीज केला. यानें राज्यांत पुनः वैदिक धर्म चालू केला आणि देवांस व ब्राह्मणांस अग्रहार करून दिले. यानें आपल्या नांवाचें एक व सुगंधा नांवाची त्याची पत्नि होती तिच्या नांवाचें एक अशी दोन देवालयें बां- धिलीं. पुढें तो अत्यंत लोभी होऊन दिलेल्या देणग्या परत घेऊं लागला व गांवकन्यांस ( वतनदारांस ) दंड करून पैसा जमवूं लागला. त्यानें आपली तुला करून तिच्यांतील तीनचतुर्थांश द्रव्य ठेवून घेतलें आणि एक- चतुर्थांश ब्राह्मणांस वाटलें. पुढें राजा कायस्थ लोकांवर विशेष प्रेम करूं लागला आणि विद्वान् ब्राह्मणांचा अनादर करून प्रजेस फार पीडा देऊं लागला. याच्या वेळीं भल्लट ह्मणून एक मोठा पंडित होता. पण राजा गुणग्राही नसल्यामुळे हा पंडित दरिद्रावस्थेत होता. यानें भछटशतक नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. हा राज्य करीत असतां एक मोठा दुष्काळ पडला. तेव्हां प्रजेचे अत्यंत हाल झाले. गोपाळवर्मा नांवाचा त्याचा दुसरा पुत्र होता, त्यास राजानें एक वर दिला होता. या वेळी पित्यानें प्रजेस पीडा देऊं नये ह्मणून बापापाशीं त्यानें तो वर मागितला. तेव्हां राजास हासूं पुत्रास ह्मणाला तूं मजपेक्षां अधिक पीडा देऊ नको येऊन तो