पान:काश्मीर वर्णन.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १६४ )

संपन्न करून दुसरों महान् कामें केली असती. हें त्याचें भाषण ऐकून लोक त्यास वेडा समजून कांहींतरी बड- बडतो असें ह्मणूं लागले. पुढे ही गोष्ट राजाच्या कानावर जाऊन त्यानें त्यास पाहिजे तेवढें द्रव्य दिलें. तें घेऊन त्यानें वितस्ता नदींत टाकिलें. ती नदी मोठ्या शिलांनीं भरलेली होती. गरीब लोकांनीं तें द्रव्य मिळविण्याकरितां तींतील सर्व शिला व दगड बाहेर काढिले. यामुळे तिचा प्रवाह चांगला चालू लागून तिच्या तीरचा प्रदेश पाण्यानें बुडालेला असे तो मोकळा होऊन तेथें पिकाऊ जमीन तयार झाली. तेव्हां देशांत पीक अधिक उत्पन्न होऊन पूर्वी एका खारीस* जेथें २०० दीनार पडत, तेथें आतां ३६ पडूं लागले. हें नाणें कोणी रोमन् व कोणी अरबी होतें असें ह्मणतात. याप्रमाणें त्यानें देश संपन्न केला. वितस्ता व सिंधु या नद्यांचा संगमही यानेंच केला. याची उपमाता जी चांडाळीण हिच्या नांवें त्यानें एक गांव वसविला व एक सेतु बांधिला. वराह अवतारी भगवंतानें समुद्रांतून पृथ्वी वर काढिली, परशुरामानें ती ब्राह्मणांस दान दिली, रामावतारी समुद्रावर सेतु बांधिला व कृष्णावतारीं कालिया सर्पाला पाण्यांतून वर काढून यमुना निर्दोष केली; हीं चार अवतारी केलेली कामें सुय्य यानें एकट्यानेंच केली. असा तो महात्मा होता. कल्लट नांवाचा दुसरा एक साधु त्या वेळी प्रसिद्धीस आला. याप्रकारें अवंतिवर्मा यानें मांधासा- प्रमाणें २७ वर्षे राज्य केलें. याच्या मागून याचा पुत्र-

  • खारी दीड मण,