पान:काश्मीर वर्णन.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १६३ )

अवंतीश्वर या नांवांची देवालयें बांधल्याचें पूर्वी सांगि- तलेंच आहे. त्यानें आपल्या राज्याचे विभाग करून आपल्या बंधूंस देऊन त्यांस प्रतिराजे बनविले. नांवाचा याचा सापत्न बंधु होता. शूरवर्मा त्यास यानें युवराज नेमिलें. हा विद्येचा मोठा चहाता होता. यामुळे याच्या आश्रयास मोठमोठाले पंडित होते. त्यांत मुक्ताकण, शिवस्वामी, आनंदवर्धन, रत्नाकर हे मुख्य होत. यांतील तिसरा व चवथा राजशेखर कवीस माहीत होते. आनंदवर्धन यानें ध्वन्यालोक, काव्यालोक व देवीशतक हे ग्रंथ केले. त्यानें कालिदास, वाण, भटोद्भट, सत्यवाहन या कवींचा आपल्या ग्रंथांत उल्लेख केला असून माघ कवीच्या कांहीं कविता घेतल्या आहेत. रत्नाकर यानें केलेला हरिविजय ग्रंथ उपलब्ध आहे.. त्यांचे वंशज काश्मीरांत अद्यापि आहेत ह्मणून समजतें. असो. अवंतिवर्मा हा शौर्याच्या कामांत ललितादित्या- सारखा मोठा प्रसिद्ध होता. यानें गुजराथ व त्रिगर्त ह्रीं राज्यें जिंकून तीं तेथील राजपुत्रांस दिली. गुजरा- थच्या राजानें टक्कं हा देश अवंतिवर्म्यास दिला.

अवंतिवर्मा हा राज्य करीत असतां सुय्य

नांवाचा एक मोठा साधु व पंडित प्रसिद्धीस आला. तो अगदी तान्हें बाळ असतां सुय्या नांवाच्या एका झाडू वालीस एका मडक्यांत ती रस्ते झाडीत असतां सांपडला. तिनें यास वाढविलें. हा विलक्षण बुद्धिमान् होता. तो जाणतेपणी एकाचे घरीं पंतोजीपणा करीत असे. असे बोलून दाखवूं लागला कीं, आहे पण द्रव्य नाहीं, तें असतें तो आपणाजवळ बुद्धि तर आपण हा देश