पान:काश्मीर वर्णन.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १६२ )

लागला. तेव्हां ते फार पीडित होऊन त्यांनी त्यास ज्ञाप दिला. त्याच्या योगानें वरील छताचा सुवर्णदंड त्याच्या मस्तकावर पडून राजा मरण पावला. त्याची माता अमृत- प्रभा हिनें पुत्राचा उद्धार व्हावा ह्मणून अमृत केशव नांवाचें देवालय बांधिलें. यानें ३१ वर्षे राज्य केलें. पुढें ललितापीड, संग्रामपीड, बृहस्पति, अजिता- पीड, अनंगापीड व उत्पलापीड हे अनुक्रमें गादीवर बसले. बृहस्पतीपासून पुढचा कथाभाग विश्वसनीय आहे. नांवाचा एक कवि प्रसिद्धीस आला होता. कांही कविता मिळतात. या सर्व राजांनी मिळून अज- मासें ७० वर्षे राज्य केलें. या कालांत सर्व राज्यभर घोंटाळा व बखेडे चालू होते. उत्पलापीड हा कर्कोट घराण्यांतील शेवटचा राजा होय. या घराण्यांत १७ राजे झाले व त्यांनी सुमारें २६० वर्षे राज्य केलें. हे राजे बौद्ध धर्माचे विशेष अभिमानी नव्हते. यांच्या मागून- विशेष अजितापीडाच्या वेळीं शंकुक याच्या

अवंतिवर्मा राजा झाला. उत्पलाक्ष घरा-

ण्यांतील हा पहिला. याचेंच नांव आदित्यवर्मा होतें. याचा राज्याभिषेक शा० शकाच्या ८७७ वे वर्षी झाला. तेव्हां काश्मीरांतील शकाचें १३१ वें वर्ष होतें. या वरून ते मान शालिवाहन शकाच्या ७४६ त सुरू झाले असावें. या राजास मंत्री फार उत्तम मिळाला असल्यामुळे तो सर्व राज्यकारभार त्याच्या सल्ल्यानें करी. हा राजा मोठा धार्मिक व न्यायी होता. त्यानें युवराज असतां अवंतिस्वामी व राज्यपद मिळाल्यावर