पान:काश्मीर वर्णन.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १६१ )

जयापीड गंडकीच्या पलीकडे जाऊन आपल्या सैन्यास मिळाला आणि पुनः नेपाळावर स्वारी करून तो देश त्यानें जिंकिला. याप्रमाणें स्वाज्या करून तो स्वदेशीं परतला. त्यानें पूर्वी कनोजचें राज्य जिंकिलें होतें. तेथील सिंहासन, जयंत राजाची कन्या कल्याणी व कलावंतीण कमला हीं बरोबर आणिलीं. स्वदेशी परत आल्यावर जज्जाबरोबर लढाई करून तीन वर्षांनी त्यानें आपले राज्य परत मिळविलें. ज्या स्थली वरील लढा- ईंत जय मिळविला तेथें आपल्या राणीच्या नांवानें कल्याणपूर त्यानें वसविलें. यानें यादवांच्या द्वारा- बतीप्रमाणें सुंदर बहिरकूट नांवाचें दुसरे एक शहर याच्या गुरूचें नांव क्षीर होतें. याजपाशीं वसविलें. दामोदरगुप्त, मनोरथ, वामन, शंखदत्त, संधिमान् इत्यादि अनेक मंत्री होते. हे मोठे पंडित होते. काशि- कावृत्ति (व्याकरणावरील ग्रंथ ) हिचा आरंभ राजानें केला व वामन पंडितानें ती शेवटास नेली. दामोदर- गुप्त यानें कुट्टिणीमत नांवाचा ग्रंथ केलेला प्रसिद्ध आहे. याच्या पदरीं जे पंडित होते त्यांत उद्भट हा मुख्य होता. यानें अलंकार शास्त्रावर एक ग्रंथ लिहिला आहे. या पंडितास दररोज एक लक्ष दिनार* देत असे असें कल्हण लिहितो. ही तर केवळ अतिशयोक्ति दिसते. पण तो विद्वानांचा मोठा आश्रयदाता होता एवढीच गोष्ट याजपासून घेण्याची आहे. असो. हा राजा अखेरीस कायस्थ लोकांच्या संगतीस लागून त्यानें ब्राह्मणांस दिलेले अग्रहार काढून घेतले आणि त्यांचा छल करूं राजा

दीनार = दद्दा माशांचें सोन्याचें नाणें.